दहेगाव येथे स्वरोजगार प्रशिक्षणातून मार्गदर्शन

By Admin | Updated: May 5, 2016 02:16 IST2016-05-05T02:16:54+5:302016-05-05T02:16:54+5:30

स्टार स्वरोजगार प्रशिक्षण संस्थान द्वारे सांस्कृतिक भवन, दहेगाव (गो.) येथे बेरोजगार युवक व युवतींकरिता उद्योजक ...

Guidance through self employment coaching in Dahegaon | दहेगाव येथे स्वरोजगार प्रशिक्षणातून मार्गदर्शन

दहेगाव येथे स्वरोजगार प्रशिक्षणातून मार्गदर्शन

कौशल्य विकास व योजनांची दिली माहिती
वर्धा : स्टार स्वरोजगार प्रशिक्षण संस्थान द्वारे सांस्कृतिक भवन, दहेगाव (गो.) येथे बेरोजगार युवक व युवतींकरिता उद्योजक विकासासंबंधी स्वयंरोजगार मार्गदर्शन शिबिर घेण्यात आले. शिबिर समन्वयक श्याम चंद्रा यांनी शिबिरार्थींना स्वयंरोजगाराच्या विभिन्न प्रशिक्षण कार्यक्रमाबद्दल विस्तृत माहिती दिली.
बेरोजगारीवर मात करण्यासाठी स्वरोजगार निर्माण करणे हाच उत्तम पर्याय आहे. ग्रामीण भागातील युवक व युवतींना स्वरोजगारासाठी प्रशिक्षण आवश्यक आहे. शेती व्यवसाय हा निसर्गावर अवलंबून असल्याने त्याची शाश्वती नाही. शेतमाल उत्पादनामध्ये शेतकऱ्यांना मोठे नुकसान सहन करावे लागत आहे. अशा वेळी शेतकऱ्यांच्या मुलांनी शेती व्यवसायासह स्वरोजगारावर भर दिला तसेच पूरक व्यवसाय शोधल्यास लाभ होईल, अशी माहिती नामदेव गुजरकर यांनी दिली.
स्टार स्वरोजगार प्रशिक्षण संस्था युवकांना नि:शुल्क प्रशिक्षण देत असून यात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले. शिबिराकरिता दहेगाव ग्रामपंचायतचे सरपंच कौरती, तिवाडे व कर्मचारी यांनी सहकार्य केले. याप्रसंगी महिला बचत गट सदस्य, दहेगाव, हेलोडी, जुनोना येथील बेरोजगार युवक व युवती उपस्थित होते. संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी सहकार्य केले.(स्थानिक प्रतिनिधी)

Web Title: Guidance through self employment coaching in Dahegaon