शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

गिरड येथे मोहरमनिमित्त भव्य शोभायात्रा

By admin | Updated: November 1, 2014 23:11 IST

मोहरमनिमित्त शेख फरीदबाबा दर्गा टेकडीवर आणि साकरबावली येथील दर्ग्याहवर शुक्रवारला सायंकाळी भव्य शाही संदलसह शोभायात्रा काढण्यात आली. हिंदु-मुस्लिम दोन्ही धर्मातील नागरिक मोठ्या

गिरड/कोरा: मोहरमनिमित्त शेख फरीदबाबा दर्गा टेकडीवर आणि साकरबावली येथील दर्ग्याहवर शुक्रवारला सायंकाळी भव्य शाही संदलसह शोभायात्रा काढण्यात आली. हिंदु-मुस्लिम दोन्ही धर्मातील नागरिक मोठ्या संख्येने या शोभायात्रेत सहभागी झाले होते. या निमित्त गिरड टेकडीवरील दर्गा, मुख्य प्रवेशद्वार तसेच साकरबावली येथील दर्गा आकर्षक रंगाने आणि आधुनिक रोषनाईने नव्या नवरीसारखा सजला होता. मोहरमनिमित्त साकरबावली दर्ग्याच्या वतीने शाही संदल काढण्यात आले. सायंकाळी ६ वाजता संदल गिरडला आला. यामध्ये बग्गी, आठ घोडे, नागपूरचे बँड पथक होते. रोषणाईही होती. बाबाच्या प्रतिमेला रथावर सजवून गावातील मुख्य मार्ग, बसस्थानक चौक, भारत माता चौक, बाजार चौक, जामा मशिद मार्गे गिरड टेकडीवर नेण्यात आले. दुसरा शाही संदल नागपूर जिल्ह्यातून सिर्सीवरून-गिरडला ७ वाजता पोहोचला. ता. पेठ येथून झेंडा चौक, बाजार चौक, भारत माता, बसस्टँडवरून गिरड टेकडीवर रात्री. १२ वा. तो विसर्जित झाला. हा शाही संदलमध्ये २५ घोडे, १० रथ, डोंगरगावचा बँड पथक, आकर्षक रोषणाई आदींनी परिसर गजबजला होता. परिसरातील हजारो नागरिक या सोहळ्यात सहभागी झाले होते. चौका-चौकात विविध संघटनाच्या वतीने पाणी, सरबत, लंगरची व्यवस्था केली होती. या शाही संदलसाठी अफसर पठान, करीमुद्दीन काजी, शेख कदीर, रहिम शेख, परवेज काजी, शेख शकील, शेख इसराईल, शमसुद्दीन काजी, नईम काजी, हमिद पटेल, जहीर काजी, रफिक शेख, शफिक पटेल, अशोक गड्डमवार, राजू नौकरकर, मोहन दीक्षित किशोर गाठे, नईम पठाण, प्रेम दीक्षित, शेख राशू, आरीफ काजी, खीली काजी, साहील काजी आदींनी सहकार्य केले. हिंदू-मुस्लीम एकतेचे प्रतीक असलेल्या येथील मोहरम उत्सवाला प्राचीन परंपरा आहे. असंख्य हिंदू बांधव उत्साहात सहभागी होतात. ठाणेदार अनिल जिट्टावार यांनी बंदोबस्त चोख ठेवला होता.(वार्ताहर)