शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-रशियाचा करार! पाकिस्तानची झोप उडाली! ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
2
Top Marathi News LIVE Updates: विधान परिषदेची निवडणूक उद्धव ठाकरेंनीच लढावी, शरद पवारांच्या राष्ट्रवादीची मागणी
3
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
4
IPL 2026: ऋषभ पंतसोबत भरमैदानात गैरवर्तन; राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला BCCIने दिला दणका
5
सीझफायर कसा वाढवला...! इराणी दूतावासाकडून 'AI' फिरकी; Video केला व्हायरल
6
भारत बनला जगातील ६ वा सर्वात श्रीमंत देश; १९,८७७ जण अल्ट्रा रिच लिस्टमध्ये, 'या' शहरात सर्वाधिक श्रीमंत
7
अयान अहमदचा 'स्वॅग', पण झटका राजेश प्रजापतीला! रीलमधील महागड्या कार अन् दोन पिस्तूल जप्त
8
बंगालमध्ये मतदानादरम्यान भाजपा उमेदवार अग्निमित्रा पॉल यांच्या कारवर हल्ला, जमावाने फोडल्या काचा
9
तैवान राष्ट्रपतींच्या विमानाला 'या' देशांच्या एअरस्पेसमध्ये नो एन्ट्री; अमेरिका चीनवर भडकला
10
"ममता बॅनर्जी यांनी स्वच्छ सरकार चालवलं असतं तर..."; खुद्द राहुल गांधींनीच  करून टाकली भाजपच्या विजयाची भविष्यवाणी!
11
“भारताला ‘नरक’ म्हणणे १४० कोटी भारतीयांचा अपमान, पण PM मोदी गप्प आहेत”; काँग्रेसची टीका
12
१५० युद्धनौका, पाणबुड्या बुडाल्या तरी होर्मुझवर इराणचे वर्चस्व...; कशाच्या जोरावर अमेरिकेला आव्हान देतोय...
13
’शिवीगाळ प्रकरणी आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करा,  प्रकाशकांना सुरक्षा द्या’, काँग्रेसची मागणी  
14
पैसा, घर गेले, मातृछत्रही हरवले; 'त्या' शहीदपुत्राची हृदयद्रावक गोष्ट, नोकरीसाठी २ कोटींची फसवणूक
15
Monalisa Bhosle : Video - “माझ्या मुलीसोबत असं काही घडेल याची...”; मोनालिसाचे आई-वडील ढसाढसा रडले
16
'कोलकाता पॅटर्न'ने मुंबईतील कंपन्यांना लुटले; फ्रेट व्यवसायाच्या नावाखाली कोट्यवधीचा गैरव्यवहार
17
केवळ ५ सेकंद! चिंतेच्या गर्तेतून बाहेर पडत झपाट्याने कामाला लागण्याचा सर्वात प्रभावी 'माईंड हॅक'!
18
"मराठीचा सन्मान हवाच, पण सक्ती नको"; रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी सरकारविरोधात संजय निरुपम रस्त्यावर उतरणार
19
इराण युद्ध आणि ८५% इथेनॉलचा धोरणात्मक धक्का; आता 'इलेक्ट्रिक' गाडी घेणे ठरणार का शहाणपणाचे?
20
पश्चिम बंगालमध्ये मतदानादरम्यान राडा, CPMच्या एजंटवर हल्ला, हाताची बोटं कापल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामसभेतून ग्रामसचिवासह सदस्यांचे पलायन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2016 00:31 IST

शहरालगत असलेल्या ११ ग्रामपंचातीपैकी एक असलेल्या साटोडा ग्रामपंचायतीमध्ये महात्मा गांधी जयंती निमित्य रविवारी ग्रामसभा झाली.

साटोडा येथील प्रकार : नागरिकांच्या प्रश्नांची उत्तरे देताना उडाली भंबेरी; समस्यांकडे दुर्लक्ष झाल्यास आंदोलनवर्धा : शहरालगत असलेल्या ११ ग्रामपंचातीपैकी एक असलेल्या साटोडा ग्रामपंचायतीमध्ये महात्मा गांधी जयंती निमित्य रविवारी ग्रामसभा झाली. या सभेत येथील ग्रामस्थांनी सरपंच प्रिती शिंदे, ग्रामसवेक सुनील गावंडे व सदस्य सागर बुचे यांच्यावर समस्यांचा भडीमार केला. यावेळी ग्रामस्थांच्या प्रश्नांसमोर निरूत्तर झालेले ग्रामसेवक गावंडे व सदस्य बुचे यांनी सभेतून पलायन केल्याने नागरिक चांगलेच संतापले.यावेळी ग्रामस्थ झाडाच्या सावलीत ग्रामपंचायत आपल्या समस्येचे निराकरण करेल या आशेने उभे राहून वाट बघत होते; मात्र त्यांची आशा हवेतच विरल्याचे दिसून आले. यामुळे ही ग्रामसभा कशासाठी घेतली असा प्रश्न उपस्थित नागरिकांनी केला. ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या अंजनीमाता नगरातील समस्येबाबत स्वातंत्र्यदिनी झालेल्या ग्रामसभेत महिला व नागरिकांनी निवेदन दिले होते. यात ग्रामसेवक व सरपंच यांनी स्वत: पाच दिवसाच्या आत निवेदनातील समस्या निकाली काढण्याचे लेखी आश्वासन दिले होते. त्यावर अद्याप कुठलीही उपाययोजना करण्यात आली नाही. त्यामुळे तलावातील पाणी घरात व विहिरीत जात आहे. नळयोजना नसल्याने नाईलाजाने तेच पाणी नागरिकांना प्यावे लागत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. अंजनी माता वॉर्डातील या समस्यांबाबत नागरिकांनी ग्राम पंचायत सदस्य सागर बुचे यांच्याशी बोलले असता या भागातील नागरिकांनी मला मतदान केले नाही. म्हणून वॉर्डात कुठलेही काम होणार नाही, असे ते म्हणाल्याचे सुनंदा जगताप, शोभा कोवे, जयश्री चौधरी, वंदना तळवेकर, आशा निदेकर, पुष्पा हेलवटकर, संतोष कोलारकर, कांता वतकर, लता कोपरकर, अविनाश हेलवटकर व इतर नागरिकांनी सांगितले. या बाबत ग्रामपंचायतीने लकडे यांच्या घराजवळील व ले-आऊट मधील पाण्याची व अंजनी माता मंदिराच्या मागील बाजूच्या साचलेल्या पाण्याची विल्हेवाट लावली नाही तर आंदोलन करण्यात येईल, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.(तालुका प्रतिनिधी)