ग्रामपंचायतीने दारूविक्री बंद करण्याच्या दिल्या सूचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2020 05:00 IST2020-03-24T05:00:00+5:302020-03-24T05:00:29+5:30

कोरोना आजाराचा प्रसार दिवसेंदिवस वाढत आहे. राज्यात दरदिवशी कोरोना विषाणूबाधितांची संख्या वाढतीवर आहे. शासनाच्या वतीने यावर आळा घालण्याकरिता कठोर पावले उचलण्यात येत आहे. नागरिकांचेही याला सहकार्य मिळत आहे. परंतु, दारूविक्रेते याला अपवाद ठरत असल्याचे दिसत आहे.

Gram Panchayat Suggestions to Stop Alcohol Sales | ग्रामपंचायतीने दारूविक्री बंद करण्याच्या दिल्या सूचना

ग्रामपंचायतीने दारूविक्री बंद करण्याच्या दिल्या सूचना

ठळक मुद्देदारूविक्रेत्यांचे धाबे दणाणले : दारू नष्ट करण्याच्याही सूचना

लोकमत न्यूज नेटवर्क
केळझर : कोरोना आजाराचा प्रसार दिवसेंदिवस वाढत आहे. राज्यात दरदिवशी कोरोना विषाणूबाधितांची संख्या वाढतीवर आहे. शासनाच्या वतीने यावर आळा घालण्याकरिता कठोर पावले उचलण्यात येत आहे. नागरिकांचेही याला सहकार्य मिळत आहे. परंतु, दारूविक्रेते याला अपवाद ठरत असल्याचे दिसत आहे. गावात रात्री उशीरापर्यंत दारूविक्रेत्यांच्या घरी मद्यपींची गर्दी असते. दारूविक्रेत्यांवर अंकुश लावण्याकरिता सोमवारी सरपंच अर्चना लोणकर, उपसरपंच सुनील धुमोने, ग्रामविकास अधिकारी सुनील गावंडे, जि.प. सदस्य विनोद लाखे, पोलीस पाटील प्रकाश खंडाळे, तंटामुक्ती अध्यक्ष दामोदर इंगोले, ग्रा.पं. सदस्य प्रवीण गायकवाड व नागरिकांनी अवैध दारूविक्रेत्यांच्या घरी जात दारूविक्री बंद करण्याची तंबी दिल ी. तसेच घरात असलेली दारू नष्ट करावी व दारूविक्री बंद करावी, असाही दम दिला.

दारूविक्रेत्यांना पदाधिकाऱ्यांनी दिली समज
येथील शिकलकरी वस्ती, पारधीबेडा, बेघरवस्ती व बसस्थानक परिसरात असलेला दारूविक्रीचा एक अड्डा आदी ठिकाणी राजरोसपणे दारूविक्री होते. येथील प्रत्येक दारूविक्रेत्याच्या घरी जात त्यांना दारूविक्रीचा व्यवसाय बंद करण्याची समज देण्यात आली.

Web Title: Gram Panchayat Suggestions to Stop Alcohol Sales