शहरं
Join us  
Trending Stories
1
“असा नेता लाभणे भारताचे भाग्य”; प. बंगाल विजयानंतर ट्रम्प यांनी केले PM मोदींचे खास अभिनंदन
2
“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
3
संजूचा धमाका; कार्तिक शर्मानंही दाखवला दम! DC ला पराभूत करत CSK नं प्लेऑफ्सची दावेदारी केली भक्कम
4
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
5
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
6
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
7
काय रे देवा! दोघांच्या गोंधळात तिसऱ्याचा फायदा; चेन्नईकरांनी Sameer Rizvi चा सोपा झेल सोडला (VIDEO)
8
“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका
9
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
10
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
11
चौकट मोडली, T20 मध्ये छाप सोडली! केएल राहुल म्हणतो; "प्रत्येक वेळी मनासारखं घडत नाही, पण…"
12
टी-२० क्रिकेटमध्ये टीम इंडियाला तोड नाही; IPL दरम्यान ICC नं केली मोठी घोषणा
13
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
14
इंडिगो विमानात पॉवर बँकचा स्फोट; विमानतळावर प्रवाशांची आपत्कालीन सुटका, एक महिला जखमी
15
Latest Marathi News LIVE: गोंदियात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी चिंतेत
16
IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली
17
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
18
Budget Travel: अवघ्या २० हजारांत अनुभवा केरळचं सौंदर्य; वायनाडला भेट देण्यापूर्वी हे नक्की वाचा!
19
IAS Ayush Goel : वडिलांनी चहा, भाजी विकून शिकवलं, लेकाने कष्टाचं सोनं केलं; २८ लाखांची नोकरी सोडली, झाला IAS
20
"माझ्या पोटात लाथ मारली, मतमोजणी केंद्रातून बाहेर फेकून दिलं"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायत सदस्याची सचिवाला भर सभेत मारहाण

By admin | Updated: March 31, 2017 01:43 IST

शहरालगत असलेल्या सावंगी (मेघे) ग्रामपंचायतीत मासिक सभा सुरू असताना सभा रद्द करण्याच्या कारणावरून

सावंगी (मेघे) येथील प्रकार : सचिवाची पोलिसात तक्रार वर्धा : शहरालगत असलेल्या सावंगी (मेघे) ग्रामपंचायतीत मासिक सभा सुरू असताना सभा रद्द करण्याच्या कारणावरून एका ग्रामपंचायत सदस्याने सचिवाला खूर्ची मारल्याची घटना गुरुवारी दुपारी घडली. या प्रकरणी सचिवाच्या तक्रारीवरून ग्रामपंचायत सदस्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस सुत्रानुसार, गुरुवारी सकाळी ११ वाजता सावंगी येथील ग्रामपंचायतीची मासिक सभा ग्रामपंचायतीच्या सभागृहात आयोजित करण्यात आली होती. या सभेला सरपंच व आठ सदस्यांसह अमरजित फुसाटेचीही उपस्थिती होती. तर काही सदस्य ग्रामपंचायतीच्या आवारात उभे होते. सभेकरिता प्रारंभी एकूण आठ सदस्यांच्या स्वाक्षऱ्या झाल्या. संख्याबळ अपुरे होत असल्याने यावेळी सदस्य अमरजित फुसाटे याने ही सभा रद्द करा, असे म्हणून सभागृहातून काढता पाय घेतला. दरम्यान, सभा सुरू करण्याकरिता आवश्यक संख्याबळ उपस्थित झाल्याने सविचाने सरपंचांच्या परवानगीने सभा सुरू केली. कालांतराने सदस्य फुसाटे याने ग्रामसचिव चांभारे यांना भ्रमणध्वनीवर संपर्क साधत सभेबाबत विचारणा केली. यावेळी सचिवांनी सभा सुरू असल्याचे सांगताच फुसाटेने त्यांना शिवीगाळ केली. त्यानंतर दुपारी ३.५० वाजता ग्रामपंचायत गाठत चांभारे यांच्याशी वाद घालत त्यांना मारहाण केली. यावेळी फुसाटेने सचिवाला खुर्ची फेकून मारल्याचे तक्रारीत म्हटले आहे. यावेळी सरपंच, सदस्य आणि ग्रामपंचायतीचे कर्मचारी उपस्थित असल्याचे चांभारे यांनी तक्रारीत म्हटले आहे.चांभारेंच्या तक्रारीवरून फुसाटेविरूद्ध भादंविच्या कलम ३५३, ३३२, ५०६, १८६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. ग्रामसचिवांवर असे हल्ले नेहमी होत असल्याने अशा सदस्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी ग्रामसेवक युनियनच्यावतीने करण्यात आली आहे.(प्रतिनिधी) ग्रामसेवक युनियनचे जिल्हाधिकारी व एसपींना निवेदनसावंगी (मेघे) येथील ग्रामसचिव चांभारे यांना मारहाण प्रकरणाचा ग्रामसेवक संघटनेने निषेध केला आहे. शिवाय ग्रामपंचायत सदस्य फुसाटे याच्यावर कारवाई करण्यासंदर्भात युनियनच्यावतीने जिल्हाधिकारी शैलेश नवाल व जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन दिले आहे. यावेळी तालुका अध्यक्ष सुधीर भोसले, तालुका सचिव संदीप दुधबडे, विभागीय उपाध्यक्ष मनोहर चांदूरकर, जिल्हा सल्लागार कैलास बर्धिया, तालुका उपाध्यक्ष कळमकर, जिल्हा सचिव सुधाकर आसुटकर यांच्यासह कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.