शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

सोयाबीन पिकाला पाखरांनी केले लक्ष्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2015 02:30 IST

यंदा सोयाबीन पिकाच्या उत्पादनावर नुकसानीचे सावट असतानाच उरल्यासुरल्या शेंगांना पाखरांसह माकडांची लक्ष केले आहे.

आंजी (मोठी) : यंदा सोयाबीन पिकाच्या उत्पादनावर नुकसानीचे सावट असतानाच उरल्यासुरल्या शेंगांना पाखरांसह माकडांची लक्ष केले आहे. यामुळे सोयाबीनचे थोडे थोडके पीकही हातून जाण्याच्या मार्गावर असल्याने शेतकरी हवालदिल झाले झाले आहेत. जून अखेरीस व जुलैच्या पहिल्या आठवड्यात अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीनची पेरणी केली. पावसाने दडी मारल्याने त्या कालावधीत ड्रीप व तुषार सिंचनाच्या सहाय्याने ओलित केले. तरीही यंदा सोयाबीनच्या शेंगा भरण्याचे प्रमाण अतिशय कमी आहे. ज्या शेंगा भरल्या आहेत त्याच्यावर रोग, किड आणि पाखरांनी हल्ला चढविला आहे. माकडांचे कळपही या पिकांमध्ये उच्छांद मांडत असल्याचे या परिसरात फेरफटका मारल्यानंतर निदर्शनास येते तीन वर्षापासून नापिकी, दुष्काळ व अन्य संकटांचा सामना करावा लागत आहे. असे असतानाही शेतकऱ्यांसमोर पुन्हा नव्याने संकट उभे ठाकले आहे आंजी परिसरात सकाळच्या सुमारास शेतांमध्ये पिकांवर पाखरांचे थवे बसलेले आढळतात. ही पाखरं सोयाबीनमधील दाणे फस्त करतात. भरीस भर म्हणून मागील काही दिवसांपासून माकडांनी पिकांमध्ये हैदोस घालणे सुरू केले आहे. काही शेत शिवारांमध्ये शेतकरी पिंप वाजवून पिकांची राखण करीत असले तरी पाखरांना आता हा आवाज नेहमीचाच झाला आहे. त्यामुळे पाखरे आवाजाने दुसरीकडे जात नसल्याचे शेतकरी सांगतात.शेती क्षेत्रातील जाणकारांनी यंदा सोयाबीन पिकात घट येण्याचा अंदाज वर्तविला असतानाच उरलेले पीक पाखरे आणि माकडे फस्त करीत असल्याने शेतकरी विवंचनेत दिसून येत आहेत. कृषी विभागाने उपाययोजना सुचवाव्या तसेच नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी परिसरातील शेतकरी करीत आहेत.(वार्ताहर)