शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

भाजी अन् फळ विक्रेत्यांना जुनी जागा द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2020 06:00 IST

मागील ४० वर्षांपासून सदर छोटे व्यावसायिक रस्त्याच्याकडेला हातगाडी लावून फळ व भाजीपाला विक्री करून कुटुंबाचा गाढा ओढत होते. परंतु, त्यांना गोलबाजारातील या जागेवरून दबावतंत्राचा वापर करून हाकलून लावण्यात आल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. पुर्वीच अनेक होतकरू तरुणांच्या हाताला काम नाही. अशातच हातगाडी लावून आपला उदरनिर्वाह करणाऱ्यांवर करण्यात आलेला हा अन्याय निंदनिय आहे.

ठळक मुद्देवर्धा न.प. कार्यालयासमोर धरणे : न्यायासाठी छोटे व्यावसायिक रस्त्यावर

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : स्थानिक गोलबाजार परिसरातील टिळक मार्केट येथे रस्त्याच्या कडेला हातगाडीवर काही छोटे व्यावसायिक फळ व भाजीपाला विक्री करायचे. परंतु, त्यांना सदर जागेवरून हाकलून लावण्यात आले आहे. त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली असून या २६ छोट्या व्यावसायिकांना जुन्याच जागी व्यवसाय करण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्यात यावी, या मुख्य मागणीसाठी मंगळवारी वर्धा न.प. कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.मागील ४० वर्षांपासून सदर छोटे व्यावसायिक रस्त्याच्याकडेला हातगाडी लावून फळ व भाजीपाला विक्री करून कुटुंबाचा गाढा ओढत होते. परंतु, त्यांना गोलबाजारातील या जागेवरून दबावतंत्राचा वापर करून हाकलून लावण्यात आल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. पुर्वीच अनेक होतकरू तरुणांच्या हाताला काम नाही. अशातच हातगाडी लावून आपला उदरनिर्वाह करणाऱ्यांवर करण्यात आलेला हा अन्याय निंदनिय आहे. गरीब व होतकरुंवर होत असलेल्या अन्याय दूर करण्यासाठी त्यांना जुन्याच जागेवर हातगाडी लावण्याची परवानी देण्यात यावी, अशी मागणी या आंदोलनाच्या माध्यमातून रेटण्यात आली. सदर आंदोलनाचे नेतृत्त्व राष्ट्रीय सम्बुद्ध महिला संघटनेच्या जिल्हाध्यक्ष शारदा झांबरे यांनी केले. आंदोलनात कांचन पलेरिया, विमल खोब्रागडे,राजू मेश्राम, संगीता तोटे, शेख इमाम, जुमेद शेख, युद्धीस्टर नांदे, वच्छला कुसेल, कमलेश चकोले आदी सहभागी झाले होते.

टॅग्स :vegetableभाज्याfruitsफळे