भाजी अन् फळ विक्रेत्यांना जुनी जागा द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2020 06:00 IST2020-03-18T06:00:00+5:302020-03-18T06:00:15+5:30

मागील ४० वर्षांपासून सदर छोटे व्यावसायिक रस्त्याच्याकडेला हातगाडी लावून फळ व भाजीपाला विक्री करून कुटुंबाचा गाढा ओढत होते. परंतु, त्यांना गोलबाजारातील या जागेवरून दबावतंत्राचा वापर करून हाकलून लावण्यात आल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. पुर्वीच अनेक होतकरू तरुणांच्या हाताला काम नाही. अशातच हातगाडी लावून आपला उदरनिर्वाह करणाऱ्यांवर करण्यात आलेला हा अन्याय निंदनिय आहे.

Give vegetable and fruit vendors old space | भाजी अन् फळ विक्रेत्यांना जुनी जागा द्या

भाजी अन् फळ विक्रेत्यांना जुनी जागा द्या

ठळक मुद्देवर्धा न.प. कार्यालयासमोर धरणे : न्यायासाठी छोटे व्यावसायिक रस्त्यावर

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : स्थानिक गोलबाजार परिसरातील टिळक मार्केट येथे रस्त्याच्या कडेला हातगाडीवर काही छोटे व्यावसायिक फळ व भाजीपाला विक्री करायचे. परंतु, त्यांना सदर जागेवरून हाकलून लावण्यात आले आहे. त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली असून या २६ छोट्या व्यावसायिकांना जुन्याच जागी व्यवसाय करण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्यात यावी, या मुख्य मागणीसाठी मंगळवारी वर्धा न.प. कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.
मागील ४० वर्षांपासून सदर छोटे व्यावसायिक रस्त्याच्याकडेला हातगाडी लावून फळ व भाजीपाला विक्री करून कुटुंबाचा गाढा ओढत होते. परंतु, त्यांना गोलबाजारातील या जागेवरून दबावतंत्राचा वापर करून हाकलून लावण्यात आल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. पुर्वीच अनेक होतकरू तरुणांच्या हाताला काम नाही. अशातच हातगाडी लावून आपला उदरनिर्वाह करणाऱ्यांवर करण्यात आलेला हा अन्याय निंदनिय आहे. गरीब व होतकरुंवर होत असलेल्या अन्याय दूर करण्यासाठी त्यांना जुन्याच जागेवर हातगाडी लावण्याची परवानी देण्यात यावी, अशी मागणी या आंदोलनाच्या माध्यमातून रेटण्यात आली. सदर आंदोलनाचे नेतृत्त्व राष्ट्रीय सम्बुद्ध महिला संघटनेच्या जिल्हाध्यक्ष शारदा झांबरे यांनी केले. आंदोलनात कांचन पलेरिया, विमल खोब्रागडे,राजू मेश्राम, संगीता तोटे, शेख इमाम, जुमेद शेख, युद्धीस्टर नांदे, वच्छला कुसेल, कमलेश चकोले आदी सहभागी झाले होते.

Web Title: Give vegetable and fruit vendors old space