शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
4
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
5
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
6
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
7
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
8
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
9
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
10
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
11
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
12
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
13
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
14
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
15
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
16
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
17
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
18
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
19
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
20
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

ओबीसींना शिष्यवृत्ती द्या, सहा लाख मर्यादेचा अध्यादेश काढा

By admin | Updated: May 4, 2015 02:07 IST

ओबीसी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळावी म्हणून विधानसभेत २०१२ मध्ये रान माजविणारे नेते सध्या सत्तेत आहेत;

वर्धा : ओबीसी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळावी म्हणून विधानसभेत २०१२ मध्ये रान माजविणारे नेते सध्या सत्तेत आहेत; पण त्यांना त्या शिष्यवृत्तीचा विसर पडलेला दिसतो़ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी आपला शब्द पाळून ओबीसी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती जाहीर करावी, अशी मागणी महात्मा फुले समता परिषदेने केली आहे़मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर विधानसभेत ११ डिसेंबर २०१२ रोजी ओबीसी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळण्यासाठी सहा लाख उत्पन्नमर्यादा करावी म्हणून लक्षवेधी लावली. विधानसभा गाजवली़ तत्कालीन सामाजिक मंत्री मोघे यांनी ती मान्यही केली; पण आदेश निघालाच नाही़ २० डिसेंबर १२ रोजी तत्कालीन विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी ओबीसी विद्यार्थ्यांना इतर विद्यार्थ्यांप्रमाणे शिष्यवृत्तीच्या माध्यमातून शैक्षणिक व परीक्षा शुल्काची १०० टक्के प्रतिपूर्ती मिळावी, अशी मागणी केली; पण त्या वेळी ती अमान्य झाली़ आज हे दोनही नेते सत्तेत आहे़ त्यांनी यापूर्वी ओबीसी विद्यार्थ्यांना दिलेल्या शब्दांना जागून ओबीसी विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीची उत्पन्नमर्यादा सहा लाख करावी, १०० टक्के शिष्यवृत्ती द्यावी, अशी मागणी निवासी उपजिल्हाधिकारी वैभव नावडकर यांना दिलेल्या निवेदनातून प्रा. दीवाकर गमे, विनय डहाके, विजय मुळे यांनी केली़(कार्यालय प्रतिनिधी)