शहरं
Join us  
Trending Stories
1
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
2
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
3
“उद्धव ठाकरे यांनीच विधान परिषदेची निवडणूक लढावी”; सुप्रिया सुळे यांनी केली आग्रहाची विनंती
4
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
5
CSK ची नवी चाल! मुंबईकर आयुष म्हात्रेच्या जागी MI च्या माजी खेळाडूला मिळाली वाइल्ड कार्ड एन्ट्री
6
उल्हासनगरात महापौरांचा पती भाजपच्या टार्गेटवर? आयुक्तांकडे महापौर पतीला एन्ट्री दिल्यावरून भाजपा नगरसेवकांचा धिंगाणा 
7
उन्हाळ्यात आवडीने कलिंगड खाताय... जाणून घ्या, किडनीवर ‘कसा’ होतो परिणाम?
8
"झालमुडी मी खाल्ली अन् मिरची... ४ मे रोजी मिठाई वाटणार!"; पश्चिम बंगालमध्ये मोदींचा मोठा दावा, ममतांवर निशाणा
9
नवरीचा अजब निर्णय! लग्नाला नकार, सासरी जाण्याऐवजी मैत्रिणीसोबत जाण्यावर ठाम; पोलीसही चक्रावले
10
स्कोडाची ८-स्पीड गिअर बॉक्सवाली कुशाक...! तोच घाट, मायलेजवर काय फरक पडला? धक्का दिला की...
11
Video: सशस्त्र जवान, मॉस्किटो फ्लीट; 'होर्मुझ'मध्ये थरार, भारताचे जहाज इराणच्या लष्कराने कसे घेतले ताब्यात, पहा व्हिडीओ 
12
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
13
"ज्या राज्याचे उपमुख्यमंत्री विमान अपघातात जातात, त्याचा..."; सुप्रिया सुळेंचे सूचक विधान
14
Ganga Saptami 2026: पितरांना सद्गती मिळावी म्हणून आजच्या तिथीला आठवणीने म्हणा 'हा' श्लोक!
15
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
16
अमराठी वाहनचालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी साहित्यिकांचा पुढाकार- मंत्री प्रताप सरनाईक
17
Gen Z कडून 'जशास तसं' उत्तर; कामाच्या ठिकाणी 'सिनियर्स'वर विश्वासच नाही, वाटतात अकार्यक्षम
18
पत्नीचे फिट राहणे पतीला आवडले नाही; जिमला जाण्यावरून झाला वाद, चिडलेल्या नवऱ्याने बायकोला संपवले अन्.. 
19
लग्नाच्या १३ वर्षांनी मोडणार टीव्ही अभिनेत्रीचा संसार? पदरात १० वर्षांचा मुलगा, म्हणाली- "मला ड्रामा नकोय..."
20
IPL 2026: ऋषभ पंतसोबत भरमैदानात गैरवर्तन; राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला BCCIने दिला दणका
Daily Top 2Weekly Top 5

शेतीमालाला योग्य आधारभूत किंमत मिळावी

By admin | Updated: November 8, 2014 01:36 IST

नैसर्गिक आपत्तीच्या काळात शेतीमालास योग्य हमीभाव मिळालाच पाहिजे. अन्यथा शेतकऱ्यांचा पेरणी प्रक्रियेपासून केलेला खर्चही निघणार नाही.

श्रेया केने वर्धानैसर्गिक आपत्तीच्या काळात शेतीमालास योग्य हमीभाव मिळालाच पाहिजे. अन्यथा शेतकऱ्यांचा पेरणी प्रक्रियेपासून केलेला खर्चही निघणार नाही. यामुळे शेतकऱ्यांवरील कर्जाचा डोंगर वाढतच जाईल. पुढील वर्षीच्या पेरणीकरिता त्याला नव्याने कर्ज घ्यावे लागेल. हे दुष्टचक्र संपविण्याकरिता शेतीमालास योग्य भाव देणे गरजेचे झाले आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफी, व्याजदरात सवलत देवून ही समस्या आटोक्यात येणार नसून याकरिता शासनस्तरावर ठोस पावले उचलण्याची गरज आहे, असे मत हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अ‍ॅड. सुधीर कोठारी यांनी व्यक्त केले. ‘लोकमत’ सोबत झालेल्या चर्चेत शेतकऱ्यांच्या स्थितीचा आढावा घेण्यात आला. यावर्षी पावसाने दिलेला दगा, शेतकऱ्यांवर ओढवलेले दुबार, तिबार पेरणीचे संकट, बोगस बियाणे, एकरी घटलेले उत्पन्नाचे प्रमाण आणि यामुळे शेतीमालाची कवडीमोल भावात करावी लागणारी विक्री यामुळे विदर्भातील कोरडवाहू शेतकरी पिचलेला आहे. शेतकऱ्यांना या स्थितीत आधार देण्यासाठी शासनाकडून धोरणात्मक मदतीची गरज आहे. शीघ्रतम आणि दीर्घतम असे धोरण आखायला हवे. हिंगणघाट बाजार समिती सोयाबीनची मोठी पेठ आहे. या खालोखाल तुर, कपाशी यांची मोठ्या प्रमाणात आवक होते. यावर प्रकाश टाकताना कोठारी यांनी बाजार समितीकडून राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती दिली. शेतीमाल घेवून येणाऱ्या शेतकऱ्यास १ रूपयात जेवण आणि निवास व्यवस्था मिळते. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या पाल्यास शिक्षणास अर्थसहाय्य केले जाते. पीक तारण योजना, वार्षिक सोडतीत लाखांवर बक्षीस शेतकऱ्यांना दिले जात असल्याने येथे अधिक आवक होत असावी, असा विश्वास व्यक्त केला. या उपाययोजना सर्वत्र राबविणे आवश्यक आहे. यंदाचे साल शेतकऱ्यांकरिता अत्यंत बिकट आहे. पिकांची कापणी करणेही परवडेनासे झाले असून शासनाने केवळ कर्जमाफी न करता शेतीमालास आधारभूत किंमत दिली पाहिजे. तसेच बियाणे, खते यात सबसिडी द्यावी, कपाशीला किमान ६ हजार रूपये प्रति क्विंटल दर मिळावा. सत्ताधाऱ्यांनी अशी घोषणा केली असून त्याच्या अंमलबजावणी प्रतीक्षा आहे. आजच्या स्थितीत ८० टक्के शेतकऱ्यांना तुटीचा सामना करावा लागणार असून आतापासूनच शासनाने ठोस निर्णय घेवून शेतकरी हिताचे धोरण राबविल्यास त्यांचेही दिवस पालटणार, अशी आशा करता येईल.