शहरं
Join us  
Trending Stories
1
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
2
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
3
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
4
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
5
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
6
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
7
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
8
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
9
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
10
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
11
Latest Marathi News LIVE Updates: आमच्यासाठी निवडणूक नाही तर दादांच्या स्मृतींचा यज्ञ - देवेंद्र फडणवीस
12
सामान्य फोनपेक्षा वेगळा! सॅटेलाइट फोन म्हणजे नक्की काय? भारतात बाळगल्यास होऊ शकते थेट जेल
13
Mumbai Local: मोठा अपघात टळला! CSMT स्थानकात दोन लोकल समोरासमोर! सिग्नल बिघाड अन् मोटरमनचे प्रसंगावधान (Watch Video)
14
IAS Kinjal Singh : संघर्षातून गाठलं यशाचं शिखर; लहानपणी वडिलांची हत्या, आईचा कॅन्सरने मृत्यू, जिद्दीने झाली IAS
15
Video: "नरेंद्र मोदी हे दहशतवादी"; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचे धक्कादायक वक्तव्य, नंतर केली सारवासारव...
16
पाकिस्तानाचा विषारी डाव! फाजिल्कामध्ये काळवंडले नद्यांचे पाणी; पंजाबची जनता आजाराच्या विळख्यात
17
१० हजार+ धावा, १७५ विकेट्स, पण आयपीएलमध्ये ५ वर्षे बेंचवर बसून राहिला 'हा' अष्टपैलू खेळाडू
18
Narasimha Navratri 2026: नृसिंह नवरात्र विशेष: नऊ दिवस नऊ उपासना; संकटमुक्तीसाठी करा ही विशेष साधना!
19
भोंगळ कारभार! रुग्णालयात गर्दी वाढली, सुरक्षा रक्षक झाला 'डॉक्टर'; जखमी तरुणाला घातले टाके
20
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
Daily Top 2Weekly Top 5

शहरात घरफोडी करणारी बालगुन्हेगारांची टोळी गजाआड

By admin | Updated: January 11, 2016 01:50 IST

शहरात चोऱ्या करून हैदोस माजविणारी बालगुन्हेगारांची टोळी शहर पोलिसांनी गजाआड केली. यात तीन बालगुन्हेगारांसह दोन सज्ञानांचा समावेश आहे.

दोन सज्ञानासह तीन बालकांचा समावेशवर्धा: शहरात चोऱ्या करून हैदोस माजविणारी बालगुन्हेगारांची टोळी शहर पोलिसांनी गजाआड केली. यात तीन बालगुन्हेगारांसह दोन सज्ञानांचा समावेश आहे. या चोरट्यांनी शहरातील तीन चोऱ्यांनी कबुली दिली आहे. यात अटक करण्यात आलेल्या बालगुन्हेगारांना सुधारगृहात दाखल करण्यात आले आहे. या बालगुन्हेगारांसह किसना रमेश राऊत रा. बोरगाव (मेघे) याची कारागृहात रवानगी करण्यात आली, तर त्याची आई इंदूबाई रमेश राऊत रा. नांदगाव वडार झोपडपट्टी ता. हिंगणघाट हिला पोलीस कोठडी देण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.अटकेत असलेला किसना राऊत हा या बालकांच्या साहाय्याने शहरात चोऱ्या करीत असल्याचे उघड झाले आहे. चोरीत लांबविलेला ऐवज त्याची आई इंदूबाई हिच्या हवाली करण्यात येत होता. ती या ऐवजाची विल्हेवाट लावीत होती. या पाच जणांकडून एका चोरीतील मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. इतर गुन्ह्याची चोरट्यांनी कबुली दिली असली तरी त्यातील मुद्देमाल जप्त करण्याची कारवाई सुरू आहे. पोलीस सूत्रानुसार, शहर ठाण्यात बोरगाव (मेघे) येथे चोरी झाल्याची तक्रार करण्यात आली होती. शिवाय त्याच परिसरात चोरीच्या घटना वाढल्याचे शहर पोलिसांच्या लक्षात आले. या भागातील चोरट्यांवर आळा घालण्याकरिता शहर ठाण्याच्या गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी लक्ष केंद्रीत केले. यानुसार तपास सुरू असतानाच पोलिसांचा संशय किसना राऊत याच्यावर गेला. त्याला संशयीत म्हणून ताब्यात घेतले असता त्याने चोऱ्यांची कबुली दिली. शिवाय यात त्याने काही बालगुन्हेगारांची नावे दिली. तसेच चोरीतील मुद्देमालाची विल्हेवाट लावण्याकरिता तो त्याच्या आईच्या स्वाधीन करण्यात येत असल्याची कबुली दिली. यावरून त्याची आई इंदूबाई राऊत हिला ताब्यात घेतले. तिनेही चोरीच्या मुद्देमालाची विल्हेवाट लावण्याची कबुली दिली. यावरून दोघांना अटक करण्यात आली तर बाल गुन्हेगारांना ताब्यात घेत त्यांना सुधारगृहात रवाना करण्यात आले. चोरीचा तपास सुरू असल्याची माहिती आहे. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक अंकीत गोयल यांच्या मार्गदर्शनात उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष वानखेडे, ठाणेदार मुरलीधर बुराडे, पोलीस उपनिरीक्षक गणेश इंगोले, सहायक उपनिरीक्षक ज्ञानेश्वर निशाणे, जमादार प्रमोद जांभूळकर, गजानन गहुकर, विशाल बंगाले, सचीन वाटखेडे व रितेश शर्मा यांनी केली.(प्रतिनिधी)