शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

शिवस्मारकाच्या जलपुजनासाठी वर्धेतील चार नद्यांचे जल रवाना

By admin | Updated: December 23, 2016 01:39 IST

मुंबई येथील अरबी समुद्रात साकारण्यात येणाऱ्या शिवस्मारकाचे भूमिपूजन व जलपूजन २४ डिसेंबरला होणार

पाणी घेऊन भाजयुमोचे पदाधिकारी मुंबईला वर्धा : मुंबई येथील अरबी समुद्रात साकारण्यात येणाऱ्या शिवस्मारकाचे भूमिपूजन व जलपूजन २४ डिसेंबरला होणार आहे. या सोहळ्यासाठी वर्धा जिल्ह्यातील प्रमुख नद्यांचे पाणी गुरुवारी पाठविण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे या निमित्त एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मंचावर खा. रामदास तडस, आमदार डॉ. पंकज भोयर, आ. समीर कुणावार, माजी आमदार दादाराव केचे, भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश बकाने, वर्धेचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष अतुल तराळे, हिंगणघाटचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष प्रेम बसंतानी, देवळीच्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष सुचिता मडावी, जि.प. सदस्य राणा रणनवरे, वर्धा न.प. भाजपा गटनेता प्रदीप ठाकरे, डॉ. शिरीष गोडे यांची उपस्थिती होती. यावेळी वर्धा जिल्ह्याच्या विविध भागातून आणलेले जल एकत्रित करण्यात आले. याप्रसंगी आ. पंकज भोयर, जिल्हाध्यक्ष राजेश बकाणे मार्गदर्शन करताना म्हणाले, केंद्र व राज्य सरकार आपल्या वचनाची पूर्ती करीत आहे. याच अनुषंगाने शिवस्मारकाचे भूमिपूजन करण्यात येत आहे. सरकार सर्व समावेश योजना सर्वसामान्यासाठी राबवित आहे. याप्रसंगी मुंबई येथे जल घेवून निघालेले भाजयुमो तालुकाध्यक्ष सुमित ढवळे, अनुराग कोटमकार, सचिन होले, अभिजीत चौधरी, अ‍ॅड. सुमित गांजरे, पवन गाडेगोने यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला वर्धेचे नगरसेवक निलेश किटे, विजय उईके, सुमित्रा कोपरे, शुभांगी कोलते, बंटी गोसावी, रेणुका आडे, गुंजन मिसाळ, संदीप त्रिवेदी, राखी पांडे, राधा चावरे, आहुजा, भुते, बुरीले, अरविंद कोपरे, सतीश मिसाळ, अभिषेक त्रिवेदी, अर्चना वानखेडे, भाजपा तालुकाध्यक्ष मनोज तरारे, अशोक कलोडे, देवळीचे नगरसेवक नरेंद्र मदनकर, सुरेश पट्टेवार, मदन चावरे, शरद आडे, विरू पांडे, श्रीधर देशमुख, श्रेया देशमुख, देवळीच्या माजी नगराध्यक्ष शोभा तडस, निलेश पोहेकर, अजय वरटकर, यांच्यासह हिंगणघाट, देवळी, आर्वी येथील नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. जलपुजनासाठी धाम, वर्धा, वणा व यशोदा या नद्यांचे पाणी आणण्यात आले. सोहळ्याप्रसंगी वर्धेतील महिला, व पुरूष नगरसेवकांनी तसेच प्रमुख मान्यवरांनी भगवा फेटा परिधान केला होता. प्रमुख मान्यवरांनी शिव छत्रपतींच्या पुतळ्याला माल्यार्पणन केल्यानंतर जल घेवून जाणाऱ्या वाहनाला मान्यवरांनी झेंडी दाखविली. कार्यक्रमाचे संचालन राहुल चोपडा यांनी केले. कार्यक्रमाला नागरिक उपस्थित होते.(प्रतिनिधी)