साडेअकरा लाख मतदार निवडणार चार आमदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2019 06:00 AM2019-09-25T06:00:00+5:302019-09-25T06:00:11+5:30

वर्धा जिल्ह्यात वर्धा, देवळी, हिंगणघाट, आर्वी असे चार विधानसभा मतदारसंघ आहेत. या मतदारसंघात एकूण ११ लाख ४९ हजार ७५८ मतदार असल्याचे जिल्हाधिकारी म्हणाले. जवळपास १ हजार ३१४ मतदान केंद्रे आहेत. निवडणुका सुरळीत आणि शांततेत पार पडाव्यात म्हणून यंत्रणा सज्ज असून १ हजार ७०१ पोलीस कर्मचारी तैनात करण्यात येणार आहेत.

Four MLAs will elect 1.55 lakh voters | साडेअकरा लाख मतदार निवडणार चार आमदार

साडेअकरा लाख मतदार निवडणार चार आमदार

Next
ठळक मुद्देचार विधानसभा : शांततेत मतदानासाठी प्रशासनाचे प्रयत्न

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया शुक्रवारपासून सुरू होत आहे. वर्धा जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघात एकूण ११ लाख ४९ हजार ७५८ मतदार आहेत. शुक्रवारपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास प्रारंभ होणार असून, ४ ऑक्टोबरपर्यंत उमेदवारी अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत.
हे अर्ज त्या-त्या विधानसभा मतदारसंघातील उपविभागीय कार्यालयात स्वीकारले जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांनी दिली. या निवडणुका शांततेत पार पडाव्यात म्हणून पोलीस यंत्रणा व प्रशासन सज्ज झाले आहे. संवेदनशील मतदान केंद्रावर केंद्रीय राखीव दलाचे जवान तैनात करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांनी दिली.
वर्धा जिल्ह्यात वर्धा, देवळी, हिंगणघाट, आर्वी असे चार विधानसभा मतदारसंघ आहेत. या मतदारसंघात एकूण ११ लाख ४९ हजार ७५८ मतदार असल्याचे जिल्हाधिकारी म्हणाले. जवळपास १ हजार ३१४ मतदान केंद्रे आहेत. निवडणुका सुरळीत आणि शांततेत पार पडाव्यात म्हणून यंत्रणा सज्ज असून १ हजार ७०१ पोलीस कर्मचारी तैनात करण्यात येणार आहेत. ४ डीवासयएसपी, १८ पोलिस निरीक्षक, १०६ पोलिस पोलिस उपनिरीक्षक एसआरपीएफ, सीएपीएफची तुकडीही राहील.

१५ चेकपोस्ट लागणार
निवडणूक काळात मतदारांना प्रलोभन देण्याकरिता रोख रक्कम, दारूसाठा व अन्य वस्तूंची वाहतूक होते. यावर पोलिस विभागासोबतच निवडणूक आयोगाची करडी नजर असणार आहे. जिल्ह्यात याकरिता १५ चेकपोस्ट असणार आहेत.

तृतीयपंथीही बजावणार मतदानाचा हक्क
जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदारसंघात तृतीयपंथीयांची संख्या एकूण १४ आहेत. एकट्या वर्धा मतदारसंघात १२ तृतीयपंथी आहेत. तर देवळी विधानसभा मतदारसंघात दोन आहेत. ही मंडळीची मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

Web Title: Four MLAs will elect 1.55 lakh voters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.