शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

आर्थिक मदतीवर प्रकरण निवळले

By admin | Updated: October 19, 2015 02:16 IST

भूगाव येथील उत्तम व्हॅल्यू कंपनीच्या वसाहतीच्या आवारात असलेल्या मंदिराच्या परिसरात येथील कंत्राटी वीजतंत्रीचा मृतदेह आढळला.

बसपाचे आंदोलन: लॉएड्स वसाहतीमधील कर्मचाऱ्याचा मृत्यू वर्धा : भूगाव येथील उत्तम व्हॅल्यू कंपनीच्या वसाहतीच्या आवारात असलेल्या मंदिराच्या परिसरात येथील कंत्राटी वीजतंत्रीचा मृतदेह आढळला. त्याचा मृत्यू येथे विजेच्या धक्क्याने झाल्याचा आरोप बसपाच्या कार्यकर्त्यांनी केला. मृतकाच्या परिवाराला कंपनीकडून मदत मिळावी याकरिता शवविच्छेदनानंतर कामगाराचा मृतदेह कंपनीच्या मुख्य गेटजवळ ठेवत रविवारी बसपाने आंदोलन केले. यावेळी कंपनी व पोलीस प्रशासनाच्या मध्यस्थतीने झालेल्या चर्चेत मृतकाच्या परिसवाराला कामगारांच्या फंडातून आर्थिक मदत देण्याच्या आश्वासनावर प्रकरण निवळले. संजय देवराव वाघमारे (४८) रा. सेलूकाटे असे मृतकाचे नाव असल्याचे सांगण्यात आले.पोलीस सुत्रानुसार, भुगाव येथील लॉएड्स स्टीलच्या वसाहतीच्या आवारातील मंदिराजवळ शनिवारी रात्रीच्या सुमारास संजय वाघमारे यांचा मृतदेह आढळून आला. यावेळी कंपनीच्या मदतीने त्याला रुग्णालयात नेण्यात आले. रविवारी सकाळी त्याचे शवविच्छेदन करण्यात आले. यानंतर मृतकाच्या कुटुंबियांनी व बहुजन समाज पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सदर मृतदेह कंपनीच्या मुख्य फाटकावर ठेवत त्याच्या परिवारातील सदस्यांना मदत मिळावी याकरिता आंदोलन पुकारले. कोणतीही अनुचित घटना घडू नये याकरिता चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सदर आंदोलन सुमारे पाच तास सुरू होते. यावेळी झालेल्या चर्चेअंती निघालेल्या मार्गावर सहमती दर्शवित आंदोलन मागे घेण्यात आले. या संदर्भात कंपनीशी संपर्क साधला असता संजयचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. त्याचा शवविच्छेदन अहवाल अद्याप प्राप्त झाला नसून अहवालानंतर काय ते सत्य समोर येईल. या आंदोलनात बसपाचे जिल्हाध्यक्ष मोहन राईकवार, मंडळ प्रभारी अ‍ॅड. सुनील डोंगरे, अ‍ॅड. हर्षवर्धन गोडघाटे, भास्कर राऊत, भैसारे, मनीष फुसाटे, प्रमोद सवई, उत्तम कांबळे, किशोर चौधरी, मंदाताई पाटील यांच्यासह सेलू काटे येथील गावकऱ्यांचा समावेश होता.(प्रतिनिधी)कामगार फंडातून मदत ासपाचे शिष्टमंडळ, उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष वानखेडे व कंपनीच्या अधिकाऱ्यात झालेल्या चर्चेत मृतकाच्या कुटुंबियांना कामगार फंडातून दोन लाख रुपयांची मदत देण्याचा निर्णय झाला. यातील ५० हजार रुपये सोमवारी तर उर्वरीत रक्कम येत्या १० तारखेला देण्याचे यावेळी ठरले.