हिंगणघाट, पुलगाव, येळाकेळी व महाबळा येथे अपघात
वर्धा : जिल्ह्यात सोमवार अपघात वारच ठरला. पुलगाव, येळाकेळी, महाबळा व वर्धा येथे झालेल्या चार अपघातात तिघांचा मृत्यू झाला तर चार जण गंभीर जखमी झाले. तसेच हिंगणघाट येथे सोमवारी रात्री झालेल्या अपघातात दोन जण ठार झाले. आज महाबळा येथे भरधाव कारने चिमुकलीला चिरडले तर पुलगाव येथे ट्रकच्या धडकेत एका युवकाचा मृत्यू झाला तर दोघे गंभीर झाले. येळाकेळी येथे ट्रकच्या धडकेत एकाचा मृत्यू झाला तर अन्य एक गंभीर जखमी झाला. वर्धा येथील अपघातात एक जण जखमी झाला.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}