शहरं
Join us  
Trending Stories
1
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
2
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
5
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
7
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
8
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
9
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
10
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
11
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
12
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
13
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
14
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
15
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
16
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
17
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
18
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
19
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
20
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

वर्धा विधानसभेत प्रथमच व्हीव्हीपॅटचा वापर

By admin | Updated: September 13, 2014 02:06 IST

विधानसभा मतदार संघात प्रथमच व्हीव्हीपॅटचा वापर सर्वच मतदान केंद्रांवर करण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे.

वर्धा : विधानसभा मतदार संघात प्रथमच व्हीव्हीपॅटचा वापर सर्वच मतदान केंद्रांवर करण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे. अशा प्रकारची यंत्रणा राज्यातील १३ मतदारसंघात होणार आहे. व्हीव्हीपॅट म्हणजेच (व्होटर व्हेरीफाईड पेपर आॅडीट ट्रेल) हे छोटे प्रिंटर मतदान यंत्रासोबत राहणार आहे. या प्रिंटरवर मतदान करणाऱ्या व्यक्तीलाच केलेले मतदान दिसेल व मतदान पूर्ण झाल्यावर ही स्लीप एका पेटीम जमा होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी एन. नवीन. सोना यांनी दिली.वर्धा मतदारसंघातील मतदारांना या नव्या पध्दतीने मतदान करण्याची संधी उपलब्ध होणार आहे. तसेच बटन दाबल्यानंतर आपले मत पेपरवर प्रत्यक्ष बघता येणार आहे. मतदान झाल्यानंतर मतदान योग्य झाल्याची पावती असलेला पेपर मतदान यंत्रासोबतच सीलबंद करून मतमोजणीच्या वेळी ईलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रावरील मोजणी व व्हीव्हीपॅटव्दारे जमा झालेल्या स्लीप यांचीही यावेळी मोजणी करण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीची घोषणा निवडणूक आयोगातर्फे करण्यात आली असून, जिल्ह्यातील वर्धा, देवळी, आर्वी व हिंगणघाट या चारही विधानसभा मतदारसंघात आदर्श आचारसंहिता लागू झाली असल्याची माहिती जिल्हाधिकारी एन. नवीन सोना यांनी आज दिली. जिल्हाधिकारी एन. नवीन सोना यांनी निवडणुकीची घोषणा होताच विधानसभा निवडणुकीसंदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेवून आढावा घेतला. विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आला आहे. जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदारसंघातील निवडणुकी संदर्भात करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची माहिती घेण्यात येणार आहे. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी शैलेंद्र मेश्राम, निवासी उपजिल्हाधिकारी सुनील गाढे, उपविभागीय महसूल अधिकारी वैभव नावडकर, उपजिल्हाधिकारी हरिष धार्मिक, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विलास माजरीकर उपस्थित होते.(प्रतिनिधी)