बँक आॅफ बडोदाला आग

By Admin | Updated: March 26, 2016 02:06 IST2016-03-26T02:06:31+5:302016-03-26T02:06:31+5:30

येथील बँक आॅफ बडोदाला होळीच्या दिवशी रात्री आग लागून फर्र्निचरसह सजावटीचे नुकसान झाले.

Fire of Bank of Baroda | बँक आॅफ बडोदाला आग

बँक आॅफ बडोदाला आग

फर्र्निचरसह सजावटीचे साहित्य खाक
हिंगणघाट : येथील बँक आॅफ बडोदाला होळीच्या दिवशी रात्री आग लागून फर्र्निचरसह सजावटीचे नुकसान झाले. या प्रकरणी सुट्टया असल्याने शुक्रवारी दुपारी बँक आॅफ बडोदाच्या अधिकाऱ्यांनी पोलीसात तक्रार केली. पोलिसांनी पंचनामा केला आहे. यात एसी वायरिंग, फर्निचरसह, सिलिंग पंखे, सजावट काही प्रमाणात जळाली असून कागदपत्राच्या नुकसानीचा अंदाज घेणे सुरू असल्याचे एएसआय प्रभाकर वाढवे यांनी सांगितले.
ही घटना बुधवारी रात्री ९.३० वाजताच्या सुमारास घडली. या आगीची माहिती मिळताच हिंगणघाट न.पा.च्या अग्निशामक दलाने घटनास्थळी पोहचून दोन तासात आग आटोक्यात आणली. घटनास्थळी नगराध्यक्ष अ‍ॅड. सुधीर कोठारी, वणा बँकेचे अध्यक्ष डॉ. निर्मेश कोठारी, सह अनेकांनी घटनास्थळी धाव घेतली. आग वेळीच आटोक्यात आल्याने दाट लोकवस्तीत मोठी दुर्घटना टळली.(तालुका प्रतिनिधी)
 

Web Title: Fire of Bank of Baroda