शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
4
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
5
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
6
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
7
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
8
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
9
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
10
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
11
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
12
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
13
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
14
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
15
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
16
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
17
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
18
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
19
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
20
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
Daily Top 2Weekly Top 5

अखेर दुकान बंदचा निर्णय संवादातून मिटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2020 05:00 IST

जिल्हा प्रशासनाने दुकानदारांना ठरलेल्या वेळेत दुकाने सुरु करुन त्या ठिकाणी सामाजिक अंतर पाळावे तसेच हॅण्ड वॉशची व्यवस्था करुन त्या ठिकाणी गर्दी होणार नाही, याची काळजी घेण्याचे आदेशीत केले आहे. मात्र, मंगळवारी शहरातील बहूतांश दुकानामध्ये याचे उल्लंघन झाल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आल्यानंतर बुधवारी पोलीस प्रशासन व नगरपालिका प्रशासनाच्यावतीने कारवाई करीत २२ दुकाने सील केली.

ठळक मुद्देसंघटनेसोबत प्रशासनाने केली चर्चा: २२ प्रतिष्ठानांवर केली होती कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : संचारबंदी असतानाही दुकानात मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून दिली. तसेच सोशल डिस्टन्सिगचेही उल्लंघन केल्याप्रकरणी बुधवारी शहरातील २२ दुकानांना सील ठोकले होते. यात दुकानदारांचा दोष नसल्याचे सांगत वर्धा मर्चंट असोसिएशनने दुकाने बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. पण, प्रशासनाने वर्धा मर्चंट असोसिएशनशी संवाद साधत यावर तोडगा काढला. त्यामुळे दुकानदारांकडून बंदचा निर्णय मागे घेण्यात आला.जिल्हा प्रशासनाने दुकानदारांना ठरलेल्या वेळेत दुकाने सुरु करुन त्या ठिकाणी सामाजिक अंतर पाळावे तसेच हॅण्ड वॉशची व्यवस्था करुन त्या ठिकाणी गर्दी होणार नाही, याची काळजी घेण्याचे आदेशीत केले आहे. मात्र, मंगळवारी शहरातील बहूतांश दुकानामध्ये याचे उल्लंघन झाल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आल्यानंतर बुधवारी पोलीस प्रशासन व नगरपालिका प्रशासनाच्यावतीने कारवाई करीत २२ दुकाने सील केली. पण, दुकानदारांनी या कारवाई विरोधात दुकाने बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे प्रशासनाने वर्धा मर्चंट असोसिएशनशी संवाद साधत या आणीबाणीच्या काळात दुकाने बंद ठेवणे उचित नसून हा निर्णय मागे घेण्यास सांगितले. त्यावर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून प्रशासनाच्या आदेशाचे पालन केले जात आहे. योग्य त्या सोयीही दुकानदार ठेवत आहे मात्र, काही ग्राहक सूचनांचे पालन करीत नाही. त्यांना वारंवार सांगुनही ते ऐकत नसेल तर त्यात दुकानदारांचा काय दोष, असा सवाल उपस्थित करण्यात आला. त्यामुळे सील ठोकण्याची कारवाई मागे घेण्याची मागणी करण्यात आली. शेवटी प्रशासनानेही संघटनेचे ऐकून घेत प्रत्येकी ५०० रुपये दंड आकारुन दुकाने सुरु करण्यास परवानगी दिली. आता यापुढे नियम न पाळणाºया ग्राहकांना २०० रुपये दंड ठोठावला जाणार आहे.अशा कठीण काळात सहकार्य करण्याची आमचीही भूमिका आहे. आजचा बंद प्रतिकात्मक होता. शुक्रवारी बाजारपेठ बंद असते. मात्र जनतेच्या हितासाठी शुक्रवारीसुध्दा दुकाने चालू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. ग्राहकांच्या सोयीकरिता सर्व सहकार्य करीत आहे. त्यामुळे ग्राहकांनीसुध्दा नियम पाळावेत.इद्रिस मेमन, सचिव वर्धा मर्चंट असोसिएशन

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसShoppingखरेदी