अखेर ‘त्या’ प्रकरणी गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2020 06:00 IST2020-03-18T06:00:00+5:302020-03-18T06:00:10+5:30

पाडुरंग राऊत हे धाम नदीच्या काठावरील शेतात सोमवारी गेले असता त्यांना नदी पात्रात मृत कोंबड्या तरंगताना दिसल्या. त्यानंतर त्यांनी सेवाग्राम पोलिसांना याची माहिती दिली. माहिती मिळताच सेवाग्राम पोलीस स्टेशनचे प्रकाश लसुंते, अभय इंगळे यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. शिवाय परिसराची बारकाईने पाहणी केली. यावेळी त्यांना परिसरात सुमारे ५०० कोंबड्या मृतावस्थेत दिसल्या.

Finally, the case was registered | अखेर ‘त्या’ प्रकरणी गुन्हा दाखल

अखेर ‘त्या’ प्रकरणी गुन्हा दाखल

ठळक मुद्देनदीपात्रातील मृत कोंबड्या फेकल्या : पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू

लोकमत न्यूज नेटवर्क
सेवाग्राम : परिसरात कुणी नसल्याची संधी साधून धाम नदीच्या पात्रात मृत कोंबड्यांची विल्हेवाट लावण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात येताच सोमवारी सेवाग्राम पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर प्रकरणी खरांगणा येथील शेतकरी पांडुरंग राऊत यांनी सेवाग्राम पोलिसांत तक्रार दिली आहे.
पाडुरंग राऊत हे धाम नदीच्या काठावरील शेतात सोमवारी गेले असता त्यांना नदी पात्रात मृत कोंबड्या तरंगताना दिसल्या. त्यानंतर त्यांनी सेवाग्राम पोलिसांना याची माहिती दिली. माहिती मिळताच सेवाग्राम पोलीस स्टेशनचे प्रकाश लसुंते, अभय इंगळे यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. शिवाय परिसराची बारकाईने पाहणी केली. यावेळी त्यांना परिसरात सुमारे ५०० कोंबड्या मृतावस्थेत दिसल्या. मंगळवारी ग्रामस्थांच्या मदतीने मृत कोंबड्या नदीपात्रातून काढण्यात आल्या. याप्रसंगी प्रतिभा जगताप, राजेंद्र खडसे, धैर्यशील जगताप यांची उपस्थिती होती. या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध सेवाग्राम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून लवकरच आरोपींना जेरबंद करू असा विश्वास पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे.

Web Title: Finally, the case was registered

टॅग्स :Policeपोलिस