शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

लसीकरणाचा टप्पा गाठतोय पन्नास हजारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 23:30 IST

शासकीय व खासगी लसीकरण केंद्रांवरून देण्यात येणारी कोविड प्रतिबंधात्मक लस ही पूर्णपणे सुरक्षित व कोरोना मृत्यू रोखण्यासाठी उपयुक्त ठरणारी असल्याचे आरोग्य यंत्रणेतील तज्ज्ञांचे म्हणणे आहे. जिल्ह्यात १६ जानेवारीपासून सुरुवातीला केवळ सहा केंद्रांवरून लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली. तर नंतर लसीकरण केंद्रांवर नागरिकांची वाढती गर्दी लक्षात घेता जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात टप्प्या टप्प्याने लसीकरण केंद्रांच्या संख्येत वाढ करण्यात आली.

ठळक मुद्देवयोवृद्ध घेताहेत स्वयंस्फूर्तीने कोविडची लस

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा :  मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात नवीन कोविड बाधित सापडण्याची गती वाढली आहे. असे असले तरी जिल्ह्यातील शासकीय व खासगी लसीकरण केंद्र गाठून अतिजोखमीच्या गटासह वयोवृद्ध व्यक्ती स्वयंस्फूर्तीने कोरोनाची प्रतिबंधात्मक लस घेत आहेत. २३ मार्चपर्यंत जिल्ह्यातील तब्बल ४५ हजार २९३ व्यक्तींनी कोविडच्या प्रतिबंधात्मक लसीचा पहिला डोज घेतला असून लवकरच वर्धा जिल्हा लसीकरणाचा पन्नास हजाराचा टप्पा गाठणार आहे.शासकीय व खासगी लसीकरण केंद्रांवरून देण्यात येणारी कोविड प्रतिबंधात्मक लस ही पूर्णपणे सुरक्षित व कोरोना मृत्यू रोखण्यासाठी उपयुक्त ठरणारी असल्याचे आरोग्य यंत्रणेतील तज्ज्ञांचे म्हणणे आहे. जिल्ह्यात १६ जानेवारीपासून सुरुवातीला केवळ सहा केंद्रांवरून लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली. तर नंतर लसीकरण केंद्रांवर नागरिकांची वाढती गर्दी लक्षात घेता जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात टप्प्या टप्प्याने लसीकरण केंद्रांच्या संख्येत वाढ करण्यात आली. सध्या ४३ केंद्रांवरून आरोग्य यंत्रणेतील अधिकारी व कर्मचारी, वयोवृद्ध, अतिजोखमीच्या गटातील व्यक्ती तसेच पहिल्या फळीतील कोविड योद्धांना काेविडची प्रतिबंधात्मक लस दिली जात आहे. मंगळवार २३ मार्चपर्यंत जिल्ह्यातील ४५ हजार २९३ व्यक्तींना कोरोनाच्या प्रतिबंधात्मक लसीचा पहिला तर ११ हजार ७९४ व्यक्तींना लसीचा दुसरा डोज देण्यात आला आल्याचे सांगण्यात आले. 

लसीकरण केंद्रांवरून देण्यात येणारी कोविडची प्रतिबंधात्मक लस कोविड मृत्यू रोखण्यासाठी उपयुक्त आहे. त्यामुळे लस घेवू इच्छिणाऱ्या लाभार्थ्याने लसीबाबत कुठलीही भीती मनात न बाळगता नजीकच्या लसीकरण केंद्रावर जावून कोविडची प्रतिबंधात्मक लस टोचून घ्यावी.- डॉ. अजय डवले, जिल्हा आरोग्य अधिकारी वर्धा. 

 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लस