शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण युद्ध थांबवायचे की सुरु करायचे...! ट्रम्प यांच्याकडे फक्त ७ दिवस! '१ मे' पूर्वी मोठा निर्णय घेण्याची शक्यता
2
बंगालमध्ये पहिल्या टप्प्यातील १५२ पैकी भाजपा किती जागा जिंकणार? अमित शाहांनी थेट आकडाच सांगितला
3
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
4
'विशाल पाटलांना तिकीट मिळणार नाही हे जयंत पाटील-विश्वजित कदमांना माहीत होतं"; पडळकरांचा मोठा गौप्यस्फोट
5
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
6
अमेरिकेच्या युद्धनौकेवर अचानक माकडाने हल्ला चढवला; होर्मुझच्या मोहिमेवर निघालेले...
7
तुमच्या घरात तुळशीच्या बाजूला ‘या’ गोष्टी ठेवल्या नाही ना? लक्ष्मी नाराज होईल, निघून जाईल!
8
विधानपरिषद निवडणुकीच्या हालचालींना वेग! भाजपने नावे पाठवली, मविआतर्फे उद्धव ठाकरे?
9
"डोनाल्ड ट्रम्प यांनी पदाची प्रतिष्ठा घालवली"; 'भारताला नरक' म्हणताच अमेरिकन खासदार कृष्णमूर्ती भडकले
10
ChatGPT नं एका झटक्यात संपवली १६ अब्ज डॉलरची कंपनी; अवघ्या ४ वर्षात शेअर्समध्ये घसरण, काय घडलं?
11
राजस्थान विधानसभेला बॉम्बने उडवण्याची धमकी, IPL सामन्यापूर्वी जयपूरमध्ये खळबळ 
12
कित्येकींनी साकारल्या राणी सईबाई; पण जिनिलीयाला पाहून चाहते म्हणतात- "सौंदर्य आणि शक्ती..."
13
Sandeepa Virk : प्रेग्नन्सी टेस्ट, ४ महिने तिहार जेल; अभिनेत्रीचा खळबळजनक खुलासा, म्हणाली, "मला रात्रीच्या वेळी..."
14
ही इलेक्ट्रीक एसयुव्ही लाँच काय झाली, ३० मिनिटांत १०,००० बुकिंग; पहा कोणती एवढी कंपनी डिमांडमध्ये आहे...
15
मंत्रिमंडळात एकत्र बसायचे, बाहेर विरोधात कुरघोड्या करायच्या? शिंदे-नाईक वादावर नागरिक नाराज!
16
शाहरुखची मॅनेजर पूजा गुरनानीनं वांद्य्रात खरेदी केले ३ आलिशान फ्लॅट्स; एका चौरस फुटाची किंमत ₹८४,०००
17
'रशियासोबत अमेरिकेनं जे केलं ते आपल्यासोबत..,' म्हणून अनेक देश वाढवताहेत आपला सुवर्ण साठा; प्रकरण काय?
18
शेजारणीकडे दिली घराची चावी अन् तिजोरीच गायब, ३४ लाख रुपयांचे दागिने चोरीला!
19
९ तासांत २ बलात्कार अन् १ हत्या, आधी मित्राच्या बायकोवर बळजबरी मग...; आरोपी राहुलचं सत्य उघड
20
केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते ‘भारत टॅक्सी’ ॲपचा शुभारंभ
Daily Top 2Weekly Top 5

पंधरा वर्षानंतर हटले अतिक्रमण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2019 06:00 IST

शिवाजी चौक ते गांधी चौक हा आर्वी शहरातील सर्वात वर्दळीचा मार्ग आहे. सकाळपासून तर रात्रीपर्यंत सतत या मार्गावर वाहनांची गर्दी पहावयास मिळते. मात्र हॉकर्सनी या मार्गावर अतिक्रमण केल्याने मार्ग अरुंद झाला होता. परिणामी या मार्गाने पायदळ चालनेही कठीण झाले होते. या मार्गावरुन जातांना चारचाकी किंचा दुचाकी वाहनांचा कुणालाही धक्का लागला तर वाद व्हायचे.

ठळक मुद्देमुख्याधिकाऱ्यांचा पुढाकार : शिवाजी चौक ते गांधी चौकपर्यंतचा रस्ता झाला मोकळा

लोकमत न्यूज नेटवर्कआर्वी : शहरातील शिवाजी चौक ते गांधी चौकापर्यंत मोठ्या प्रमाणात अतिक्रमण वाढले होते. त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता. अखेर नगरपालिकेचे मुख्याधिकारी विद्याधर अंधारे यांनी पुढाकार घेत पंधरा वर्षापासूनचे अतिक्रम हटवून रस्ता मोकळा केल्याने शहरवासीयांनी सुटकेचा श्वास घेतला.शिवाजी चौक ते गांधी चौक हा आर्वी शहरातील सर्वात वर्दळीचा मार्ग आहे. सकाळपासून तर रात्रीपर्यंत सतत या मार्गावर वाहनांची गर्दी पहावयास मिळते. मात्र हॉकर्सनी या मार्गावर अतिक्रमण केल्याने मार्ग अरुंद झाला होता. परिणामी या मार्गाने पायदळ चालनेही कठीण झाले होते. या मार्गावरुन जातांना चारचाकी किंचा दुचाकी वाहनांचा कुणालाही धक्का लागला तर वाद व्हायचे. अशा घटना या मार्गावर नित्याच्याच झाल्या होत्या. त्यामुळे या मार्गावरील अतिक्रमाणामुळे नागरिकांचे अवागमण अडचणीचे झाले होते. शहरवासीयांच्या मागणीनुसार नगरपालिकेचे मुख्याधिकारी विद्याधर अंधारे यांनी या गंभीर समस्येकडे लक्ष देऊन अतिक्रमण हटविण्याची मोहिम हाती घेतली. त्यांनी या मार्गावरील अतिक्रमण हटवून हातठेले चालकांना नगरपालिकेच्या आठवडी बाजारामध्ये जागा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. तसेच नगरपालिकेतर्फे या रस्त्यावरील दुकानांसमोर दुचाकी वाहनांकरिता पिवळ्या रंगाचा वाहतूक नियंत्रण व्यवस्थापन पट्टाही आखण्यात आला आहे. पुन्हा या मार्गावर हॉकर्सनी आपली दुकानदारी थाटल्यास त्यांच्याविरुद्ध नगरपालिका व पोलीस प्रशासनाच्यावतीने कारवाई करण्यात येणार असल्याचेही मुख्याधिकाऱ्यांनी सांगितले. या करिता उपविभागीय अधिकारी कार्यालय व पोलीस विभागाने सहकार्य करण्याचीही विनंती नगरपालिकेच्या मुख्याधिकाºयांनी केली आहे.

टॅग्स :Enchroachmentअतिक्रमण