मुलाकडून वडिलांची गळा आवळून हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2020 05:00 AM2020-07-14T05:00:00+5:302020-07-14T05:01:28+5:30

चोरडिया ले-आऊट परिसरातील मृत सुरेश डकरे (५५) त्यांची पत्नी सुनिता मुलगा आकाश हे नामदेव वानखेडे यांच्या घरी किरायाच्या घरात राहत होते. मृत सुरेश डखरे यांना दारूचे व्यसन असल्याने नेहमीच त्यांच्या घरात वाद होत होता. मिस्त्री काम करून ते आपल्या कुटुंबाचा गाडा चालवित असे.

Father strangled by son | मुलाकडून वडिलांची गळा आवळून हत्या

मुलाकडून वडिलांची गळा आवळून हत्या

Next
ठळक मुद्देआरोपीस तीन दिवस पोलीस कोठडी : आर्वी शहरात एकच खळबळ

लोकमत न्यूज नेटवर्क
आर्वी : घरगुती वादातून मुलाने वडिलांची गळा आवळून हत्या केली. स्टेशन वॉर्ड परिसरातील चोरडिया लेआऊट येथे रविवारी रात्री ही घटना घडली. या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली. आरोपी मुलाला पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर केले असता बुधवारपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला.
चोरडिया ले-आऊट परिसरातील मृत सुरेश डकरे (५५) त्यांची पत्नी सुनिता मुलगा आकाश हे नामदेव वानखेडे यांच्या घरी किरायाच्या घरात राहत होते. मृत सुरेश डखरे यांना दारूचे व्यसन असल्याने नेहमीच त्यांच्या घरात वाद होत होता. मिस्त्री काम करून ते आपल्या कुटुंबाचा गाडा चालवित असे. रविवारी रात्रीच्या सुमारास सुरेश डकरे दररोजप्रमाणे मद्य प्राशन करून घरी आले आणि पत्नीला जेवायला वाढण्यास सांगितले. जेवण देण्यास उशिर झाल्याने सुरेश डखरे याने ताट फेकून दिले. दोघांमध्ये वाद झाला. सुरेश डकरे हे पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन शिवीगाळ करुन मारहाण करू लागले.
ही बाब मुलगा आकाश डकरे (२४) याच्या निदर्शनास येताच त्याने वडिलांना हटकून आईला शिवीगाळ का करीत आहे असे म्हटले. बापलेकात चांगलाच वाद झाला. दरम्यान मुलगा आकाश याने वडिल सुरेश डखरे यांना धक्का दिला असता ते गल्लीत पडले. गल्लीत असलेलया पाण्याच्या माठाची लोखंडी आडणी त्यांच्या डोक्याला लागल्याने डोक्यातून रक्तस्त्राव होऊ लागला. दरम्यान आकाश डखरे हा वडिलांच्या छातीवर बसला आणि माठाला लावून असलेल्या टॉवेलने वडिल सुरेश डकरे यांचा गळा आवळून त्यांची हत्या केली.
ही बाब पत्नी सुनिता डकरे यांच्या लक्षात येताच त्यांनी मुलाला सोबत घेऊन पोलीस ठाणे गाठून याबाबतची तक्रार देत मुलगा आकाश याला पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलिसांनी आकाश डकरे याला अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तीन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप मैराळे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक गोपाळ ढोले, अखिलेश गव्हाणे, रविंद्र खरे, राहुल देशमुख, प्रकाश सानप करीत आहे.

Web Title: Father strangled by son

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Murderखून