शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

अर्धवट पुलावरून ग्रामस्थांचा जीवघेणा प्रवास

By admin | Updated: September 28, 2016 01:48 IST

सेलू ते झडशी मार्गावर वडगाव येथे काही महिन्यांपूर्वी ठेंगणा पूल उंच करण्यासाठी निधी मंजूर केला होता.

सेलू ते झडशी मार्गावरील प्रकार : कंत्राटदाराने बांधकाम ठेवले अर्धवट, बांधकाम विभागाचे दुर्लक्षझडशी : सेलू ते झडशी मार्गावर वडगाव येथे काही महिन्यांपूर्वी ठेंगणा पूल उंच करण्यासाठी निधी मंजूर केला होता. पुलाच्या कामाला सुरूवातही करण्यात आली. पावसाळा सुरू झाल्याने सदर काम अर्धवटच सोडण्यात आले. परिणामी, ग्रामस्थांना दररोज जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. बांधकाम विभागाने याकडे लक्ष देत कार्यवाही करावी, अशी मागणी होत आहे. सेलू ते झडशी मार्गावर वडगाव येथे अत्यंत ठेंगणा पूल होता. थोडा पाऊस आला तरी या पुलावरून पाणी राहत होते. परिणामी, वाहतुकीमध्ये अडथळा निर्माण होत होता. यामुळे आमदार निधीतून उंच पुलाचे काम मंजूर करण्यात आले. सदर कामास कंत्राटदाराने सुरूवातही केली; पण ते अर्धवट सोडण्यात आले. नव्याने बांधकाम केलेल्या पुलावर दोन्ही बाजूला कठडे बसविणे गरजेचे होते; पण ते काम अद्याप पूर्ण करण्यात आले नाही. यामुळे अपघाताची शक्यता बळावली आहे. पूल उंच झाला असल्याने तो आता अधिक धोकादायक झाला आहे. अगदी पुलाला लागून सार्वजनिक आरोग्य केंद्र आहे. तेथे खोलगट भाग निर्माण झाला. पाणी जमा होऊन आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. बांधकाम विभाग मात्र याकडे दुर्लक्ष करीत आहे. पुलाचे अर्धवट राहिलेले बांधकाम त्वरित पूर्ण करावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.(वार्ताहर)