शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

खुणावते फॅशनची अनोखी दुनिया

By admin | Updated: June 14, 2014 23:48 IST

फॅशनची दुनिया काही औरच आहे. नवनवीन ड्रेसेस, डिझायनर साडी, दागिने, चप्पल व शूज, पर्स आणि आणखी किती तरी. भारतातील फॅशन डिझायनर्सनी तर जागतिक यश प्राप्त केले आहे. रितू कुमार,

वर्र्धा : फॅशनची दुनिया काही औरच आहे. नवनवीन ड्रेसेस, डिझायनर साडी, दागिने, चप्पल व शूज, पर्स आणि आणखी किती तरी. भारतातील फॅशन डिझायनर्सनी तर जागतिक यश प्राप्त केले आहे. रितू कुमार, राघवेंद्र राठौर, रोहित बाल, रितू बेरी, रोहित गांधी, राहुल खन्ना, शंतनू आणि निखिल असे किती तरी फॅशन डिझायनर्स आहेत, ज्यांनी जागतिक कीर्ती प्राप्त केली आहे.भारतातील वस्त्रनिर्मितीचा व्यवसाय प्रचंड प्रमाणात विस्तारत आहे. २००९ मध्ये ७६.३ मिलियन डॉलर्स एवढी निर्यात भारतातील उद्योगांनी केली आहे. भारतातील वस्त्र आणि कॉटन उद्योगाचा जीडीपीमध्ये ४ टक्के वाटा आहे. एकूण उत्पादन क्षेत्रापैकी १४ टक्के वाटा वस्त्र उत्पादनाने काबीज केला आहे. टेक्नॉलॉजी आणि गारमेंट मॅन्युफॅक्चरिंग (वस्त्रनिर्मिती) मध्ये एकूण ३५ दशलक्ष मनुष्यबळ प्रत्यक्ष काम करीत असून, अप्रत्यक्ष ५४.८६ मिलियन मनुष्यबळ या उद्योगात कार्यरत आहे. म्हणजे एकूण ८९.८६ मिलियन मनुष्य असणारी ही फॅशनची दुनिया आहे. भारतातील जेवढी वस्त्रनिर्मिती होते त्यापैकी ६० टक्के माल हा यूएस, जपान, युरोपियन युनियन येथे निर्यात होतो. यावरूनच लक्षात येते की, फॅशन टेक्नॉलॉजी आणि गारमेंट मॅन्युफॅक्चरिंगमध्ये करिअरच्या मोठ्या संधी आहेत. फॅशनच्या या दुनियेत उच्च दर्जाची फॅशन टार्गेटबरोबरच रेडी टू वेअर, स्पोर्ट वेअर, अ‍ॅक्सेसरीजमध्ये करिअरकरिता संधी आहे. डिझाइन अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी, लेदर अ‍ॅपिरिअल डिझाइन अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी, टेक्स्टाइल डिझाइन अ‍ॅण्ड डेव्हलपमेंट, फॅशन कम्युनिकेशन इत्यादी नवीन क्षेत्रे विस्तारत आहेत. फॅशन टेक्नॉलॉजीत कमी ग्राहकसंख्या असलेल्या फॅशनच्या वर्गाबरोबर होलसेल आणि इतर ग्राहकांसाठी वस्त्र व इतर फॅशन अ‍ॅक्सेसरीजची मागणी आहे. त्यामुळे फॅशन डिझायनिंग आणि गारमेंट्स बनविण्याच्या क्षेत्रात करिअरच्या संधी आहेत.