शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
4
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
5
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
6
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
7
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
8
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
9
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
10
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
11
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
12
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
13
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
14
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
15
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
16
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
17
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
18
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
19
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
20
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना पंचनाम्याची प्रतीक्षाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2019 06:00 IST

परतीच्या पावसाने पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असताना शासकीय यंत्रणा कुंभकर्णी झोपेत आहे. कुणीही अधिकारी चौकशीसाठी शेतशिवाराकडे फिरकले नाहूीत. यामुळे शेतकरीवर्गात असंतोष व्यक्त होत आहे. सततच्या पावसाने सोयाबीन, कपाशीचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक शेतकऱ्यांचे सोयाबीन, ज्वारी बारीक पडली आहे.

ठळक मुद्देपरतीच्या पावसाचा फटका : सोयाबीनने दिला दगा, शेतकरी चिंताग्रस्त, कपाशीला अज्ञात रोगाची लागण

लोकमत न्यूज नेटवर्ककारंजा (घा.) : २७ आॅक्टोबरला झालेल्या परतीच्या मुसळधार पावसाने तालुक्याला अक्षरश: झोडपले. सोयाबीन, पºहाटी, झेंडू पिकासह बागायदार शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अद्याप तालुक्यात ढगाळ वातावरण कायम असल्याने शेतकरी धास्तावलेले आहेत.परतीच्या पावसाने पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असताना शासकीय यंत्रणा कुंभकर्णी झोपेत आहे. कुणीही अधिकारी चौकशीसाठी शेतशिवाराकडे फिरकले नाहूीत. यामुळे शेतकरीवर्गात असंतोष व्यक्त होत आहे.सततच्या पावसाने सोयाबीन, कपाशीचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक शेतकऱ्यांचे सोयाबीन, ज्वारी बारीक पडली आहे. उत्पादनात कधी नव्हे इतकी घट झाली आहे. त्यातच शेतमालाला दिल्या जाणाऱ्या अल्पभावाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. सोयाबीन कवडीमोल भावात विकले जात आहे. पांढºया सोन्यावर अज्ञात रोगाचे सावट असून पऱ्हाटी कापूस येण्यापूर्वीच पिवळी पडू लागली आहे.कपाशीच्या उत्पादनात मोठी घट होणार आहे. या भागात अद्याप शेतकऱ्यांनी शीतदहीसुद्धा केले नाही. तालुक्यातील महत्त्वाचे असलेले संत्रा पीकसुद्धा धोक्यात आले आहे. ढगाळ हवामानामुळे संत्रा पिकाला गळती लागली आहे. ऑक्टोबर महिन्यात शेतकरी संत्रा बागांची तयारी करतात. शेतकऱ्यांची बेगणी बांधणे, आळे करणे ही कामे सुरू असतात. परंतु जमिनीमध्ये एवढा ओलावा आहे की, शेतामध्ये वखरण, कल्टीव्हेटर काहीही करता येत नाही. त्यामुळे वाढलेले तण काढणे सुध्दा शक्य नाही. परिणामी, शेतात डासांचा प्रादुर्भाव वाढल्याने संत्रा फळाला गळती लागली आहे. त्यामुळे शेतकरी चिंतित आहेत.शेतामध्ये असलेल्या ओलाव्यामुळे रब्बी हंगामपूर्व मशागतीला शेतकऱ्यांनी सुरुवात केलेली नाही. ाालुक्यात सध्या वाघाची दहशत असून दररोज कुठे ना कुठे घटना घडत आहे. त्यामुळे शेतकरी शेतात जायलासुद्धा तयार नाहीत. अशा अनेक अस्मानी संकटांनी शेतकरी त्रस्त असताना शासन स्तरावरून कोणतीही मदत मिळालेली नाही. शासकीय यंत्रणेने अद्याप नुकसानाची साधी चौकशीसुद्धा केलेली नाही.तीन वर्षांच्या नापिकीनंतर यंदाही अतिवृष्टीने नुकसानतीन-चार वर्षांपासून सातत्याने शेतकऱ्यांना नापिकीचा सामना करावा लागत आहे. यंदा पावसाचे विलंबाने आगमन झाले. त्यानंतर मात्र, दीड महिना पावसात सातत्य राहिल्याने पिके बहरली. अतिवृष्टी झाल्याने शेतांमध्ये पाणी साचून पिके पाण्याखाली येत पिवळी पडली. अनेक रोगांनीही आक्रमण केल्याने यावेळीही सोयाबीन, कपाशीचे उत्पादनात घट येईल, अशी सद्यस्थिती आहे.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी