शेतकऱ्यांकडून बैलजोडीलाच पसंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2020 06:00 IST2020-03-14T06:00:00+5:302020-03-14T06:00:28+5:30

शेतकऱ्यांकडून दरवर्षी गुढीपाडव्याच्या दिवसात नवीन सालगड्यासह नवीन बैलजोडी खरेदी करण्यावर भर देतात. मराठी नवीन वर्षाची सुरुवात चांगली व्हावी, याकरिता शेतकरी बैल किंवा बैलजोडी खरेदीवर भर देतात. त्यामुळेच या दिवसात ठिकठिकाणी बैलबाजार भरतो. केळझर येथेही गेल्या तीन दिवसांपासून बैलांची दावण लागली आहे.

Farmers prefer the bullock | शेतकऱ्यांकडून बैलजोडीलाच पसंती

शेतकऱ्यांकडून बैलजोडीलाच पसंती

ठळक मुद्देतीन दिवसांपासून बैलांची दावण : यांत्रिकीकरणातही मागणी कायम

लोकमत न्यूज नेटवर्क
केळझर : शेतकरी आणि बैल हे दोघेही एकमेकांचे मित्र समजले जात असल्याने दोघांशिवाय शेतीची मशागत अश्यकच आहे. दरम्यानच्या काळात शेतीकरिता यात्रिकरणावरच भर दिल्या जात असतांनाही सर्वच कामे यंत्राणे करणे शक्य नाही. त्यामुळे शेतीच्या मशागतीकरिता आजही शेतकऱ्यांकडून बैलाची मागणी होत आहे. बैलांच्या किंमती सध्या वाढलेल्या असतानाही घरातील खुट्याला बैलाशिवाय पर्याय नसल्याचे सांगतात.
शेतकऱ्यांकडून दरवर्षी गुढीपाडव्याच्या दिवसात नवीन सालगड्यासह नवीन बैलजोडी खरेदी करण्यावर भर देतात. मराठी नवीन वर्षाची सुरुवात चांगली व्हावी, याकरिता शेतकरी बैल किंवा बैलजोडी खरेदीवर भर देतात. त्यामुळेच या दिवसात ठिकठिकाणी बैलबाजार भरतो. केळझर येथेही गेल्या तीन दिवसांपासून बैलांची दावण लागली आहे. येथे ६० हजार रुपयांपासून १ लाखांपर्यंत बैलजोडीची किंमत आहे. काही वर्षांपासून शेतकरी बैलजोडी विकून यंत्राच्या सहाय्याने शेती करायला लागला. मात्र, महागाईमुळे आणि बहुतांश शेतकऱ्यांनी यांत्रिकीकरणाकडे पाठ फिरविल्याने पुन्हा सरजा-राज्याच्या जोडीकडेच लक्ष केंंद्रीत केले आहे. बैलजोडीशिवाय शेतीला गती नाही. तीनही ऋुतूमध्ये बैलजोडीने मशागत करणे शक्य होत असल्याने बैलांच्या खरेदीकरिता गर्दी वाढली आहे. उन्हाळवाहीचे काम सुरु झाले असून याकरिता दमदार बैल किंवा बैलजोडी खरेदी केली जात आहे. काही शेतकरी त्यांच्याकडील जुन्या जोडीच्या मोबदल्यात अधिकचे पैसे देऊन नवीन बैलजोडी खरेदी करीत आहे. काही शेतकरी या दावणीतील बैलांना बैलबंडीला किंवा वखराला जुंपून तो शेतीयोग्य आहे किंवा नाही याची पारख करण्यासाठी बैलविक्रेतेही मुभा देत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची फसगत होण्याची शक्यता नसल्याने समाधान व्यक्त होत आहे.

Web Title: Farmers prefer the bullock

टॅग्स :Farmerशेतकरी