शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

वर्धेतून फुंकला होता शेतकरी स्वातंत्र्याचा बिगूल

By admin | Updated: December 13, 2015 02:13 IST

म.गांधी व आचार्य विनोबा भावे यांनी स्वातंत्र्य लढ्यासाठी वर्धा ही आंदोलन भूमी केली होती.

आठवणीतले शरद जोशी : सरोज काशीकर यांच्याकडील अविस्मरणीय नोंदीवर्धा : म.गांधी व आचार्य विनोबा भावे यांनी स्वातंत्र्य लढ्यासाठी वर्धा ही आंदोलन भूमी केली होती. ही पार्श्वभूमी ध्यानात घेत शेतकरी नेते शरद जोशी यांनीही शेतकऱ्यांच्या स्वातंत्र्यासाठी वर्धा आंदोलनाची भूमी निश्चित केली. याच भूमीतून शेतकरी संघटनेचा पाया मजबूत झाला. येथे शरद जोशी यांनी केलेल्या आंदोलनाने शासनाच्या पायाखालची वाळू सरकली. वर्धेच्या मातीशी त्यांची जुळलेली नाळ शेवटच्या श्वासापर्यंत कायम होती. त्यांच्या रूपाने शेतकरी आंदोलकांचा राजा हरपला. त्यांची आंदोलने निधनानंतरही स्मृती रूपात शेतकऱ्यांना सन्मानाने जगण्याचे बळ देत राहील, अशा शब्दात शेतकरी संघटनेच्या उच्चाधिकार समितीच्या अध्यक्ष सरोज काशीकर यांनी त्यांच्या वर्धेतील आठवणींना उजाळा दिला. १९७८-८९ मध्ये विजय जावंधिया, रवी काशीकर, सुमंत पाटील, विजय काटकर, शशांक सबाने, अरुण डोंगरे, सुभाष बोकडे, रंगराव वैद्य ही मंडळी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर विचार करीत. अशातच त्यांना शरद जोशींबाबत कळले. त्यांनी जोशी यांना त्यावेळी वर्धेत आणून शेतकऱ्यांचे शिबिर घेतले. शिबिराला सुमारे शंभर शेतकरी हजर होते. त्यावेळी त्यांनी ‘भारतीय शेतीची पराधीनता’ ही पुस्तिका प्रकाशित केली. ही त्यांच्या शेतकरी आंदोलनाची पहिली लेखन पुस्तिका होती. वसंत तुपकर, लांबट ही मंडळी याची साक्षीदार होती. या पुस्तिकेच्या माध्यमातून त्यांनी भविष्यातील शेतकरी आंदोलनाची रूपरेषाच सांगून टाकली. आंदोलनाच्या माध्यमातून ते अनेकदा वर्धेला आले. ग्रामीण शेतकरी व त्यांच्या पत्नीची बिकट परिस्थितीशी सुरू असलेली झुंज ते स्वत: बघायचे. विश्राम भवनात ते कधीही राहिले नाही. शेतकऱ्यांच्या घरीच जे असेल ते जेवण करीत होते. ते प्रकृती चांगली असेपर्यंत कार्यकर्त्यांत राहायचे. कार्यकर्ते जेथे झोपतील, तेथेच ते आपली व्यवस्था करीत. तो आंदोलकांसोबत राहणारा आंदोलक होता. त्यांना डोंगर चढायची आवड होती. शिवाजी महाराजांनी लढाया जिंकल्या त्या डोंगर चढून, आपल्याला शेतकऱ्यांची लढाई जिंकायची आहे, तेव्हा डोंगर चढता आले पाहिजे, अशी कोटी करीत ते रस्त्यात डोंगर दिसले की गाडी थांबवून चढत. प्रत्येकाची जातीने चौकशी करीत. नाश्ता कमी पडला तर ते स्वत: किचनमध्ये जात मदत करीत. त्यांना थालीपीठ व शिळ्या पोळ्यांचा कुस्कारा आवडे. चांगले दही कसे करायचे, याचे सल्लेही ते देत असत. त्यांची मुलगी गौरी सेवाग्राम येथे शिकायला होती. ती एमडी झाली. अमेरिकेत नामांकित कंपनीत क्वॉलिटी मॅनेजमेंट पदावर आहे. दुसऱ्या दिवशी आंदोलन आहे, काय होईल याची पर्वा न करता हसत खेळत असत. अशा अनेक आठवणींना उजाळा दिला. त्यांच्या जाण्याने शेतकरी चळवळीत मोठी पोकळी निर्माण झाली, असे सांगताना त्या भाऊक झाल्या होत्या.