शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांचा शेतमाल उघड्यावर, व्यापाऱ्यांचा शेडमध्ये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 05:00 IST

बाजार समितीमध्ये खरेदी केलेला शेतमाल व्यापाऱ्यांना उचलण्यासाठी काही कालावधी लागत आहे. दोनच शेड असल्याने व्यापाऱ्यांनी खरेदी केलेला शेतमाल आणि शेतकऱ्यांचा विक्रीकरिता आलेला शेतमाल ठेवण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे. यातच पावसाने हजेरी लावली तर शेडबाहेर असलेला शेतमाल ओला होऊन शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडत आहे.

ठळक मुद्देवर्धा बाजार समितीत शेडची कमतरता : लॉकडाऊनमुळे अडला व्यापाऱ्यांचा माल

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : येथील बाजार समितीमधील तीन शेड गेल्या वर्षभरापासून भाजी बाजाराकरिता वापरली जात असल्याने शेतमाल ठेवण्याकरिता सध्या दोनच शेड उपलब्ध आहेत. अशातच आता लॉकडाऊनमुळे व्यापाऱ्यांना खरेदी केलेला शेतमाल साठविण्याची अडचण असल्याने तो शेडमध्ये दिसून येत आहे. परिणामी शेतकऱ्यांना आपला शेतमाला उघड्यावर ठेवावा लागतो. पावसाने हजेरी लावली तर शेतकऱ्यांना नुकसानीचाही सामना करावा लागत आहे.कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्ह्यात कडक निर्बंध लादल्याने बाजार समित्याही बंद होत्या. त्यासोबतच राज्यभरातही लॉकडाऊन असल्याने व्यापाऱ्यांना वाहनाअभावी कृषी उत्पन्न बाजार समितीतील खरेदी केलेला शेतमाल इतरत्र हलविता आला नाही. शिथिलता मिळाल्यानंतर काही प्रमाणात शेतमाल इतर ठिकाणी हलविला. तसेच बाजारात शेतमालाची आवकही वाढायला लागल्याने यात शेतमालाची आणखी भर पडली. त्यामुळे बाजार समितीमध्ये खरेदी केलेला शेतमाल व्यापाऱ्यांना उचलण्यासाठी काही कालावधी लागत आहे. दोनच शेड असल्याने व्यापाऱ्यांनी खरेदी केलेला शेतमाल आणि शेतकऱ्यांचा विक्रीकरिता आलेला शेतमाल ठेवण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे. यातच पावसाने हजेरी लावली तर शेडबाहेर असलेला शेतमाल ओला होऊन शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडत आहे. 

बाजार समितीतील व्यवस्थाबाजार समितीमध्ये आवाक वाढली असून शेतकऱ्यांचा शेतमाल उघड्यावर तर व्यापाऱ्यांचा शेडमध्ये अशी अवस्था आहे. त्यामुळे पाऊस आल्यानंतर शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागते. गुरुवारी सायंकाळी पावसाने हजेरी लावल्याने माझ्या शेतमालासोबतच काही शेतकऱ्यांचा शेतमाल ओला झाला. त्यामुळे शेतकऱ्यांची चांगलीच धावपळ उडाली होती.- गौरव लोखंडे,शेतकरी बेलगाव. 

बाजार समितीमध्ये पाच शेडची व्यवस्था असून वर्षभरापासून तीन शेड भाजी बाजाराकरिता दिले आहे. आता शेतमालाकरिता दोनच शेड उपलब्ध आहेत. लॉकडाऊनमुळे व्यापाऱ्यांचे खरेदी केलेले धान्य शेडमध्ये होते. शिथिलता मिळाल्यानंतर त्यांनी ते त्यांच्या गोदामात नेले. आता आवक वाढल्याने व्यापाऱ्यांनाही खरेदी केलेले धान्य उचलन्यासाठी थोडा वेळ लागत आहे. त्यामुळे व्यापारी आणि शेतकऱ्यांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. नुकताच जुन्या शेडमध्ये धान्य ठेवण्याची व्यवस्था केली आहे.- समीर पेंडके,   सचिव, कृषी उत्पन्न बाजार समिती वर्धा. 

 

टॅग्स :Market Yardमार्केट यार्डFarmerशेतकरी