शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

मुलाच्या मृत्यूचे दु:ख बाजूला सारून शेतकरी करतोय पेरणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2020 05:00 IST

कारंजा (घा.) तालुक्यातील नारा येथील शेतकरी रमेश बनसोड यांच्याकडे अडीच एकर शेती आहे. त्यांनी सन २००८ मध्ये पीककर्ज घेतले. आर्थिक परिस्थिती नाजूक असल्याने आणि निसर्गानेही साथ न दिल्याने तेव्हापासून ते कर्जाची परतफेड करू शकले नाही. सरकारने कर्जमाफी जाहीर केली. मात्र, त्याचा प्रत्यक्ष लाभ या शेतकऱ्याला मिळाला नसल्याने बँकेनेही पुन्हा शेतीसाठी कर्ज दिले नाही.

ठळक मुद्देखत अन् बियाण्यांसाठी पत्नीचे दागिने ठेवले गहाण, नारा येथील बळीराजाची व्यथा

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कोरोना संकटातही शेतकरी जगावा असे धोरण राज्य सरकार राबवित असले तरी कर्करोगाने मुलाचा मृत्यू झाल्याचे दु:ख बाजूला सारुन साध्या बियाण्यांच्या खरेदीसाठी पत्नीचे दागिणे शेतकऱ्याला गहाण ठेवून पेरणी करावी लागल्याची धक्कादायक बाब उजेडात आली आहे. त्यामुळे शासनाच्या योजना नावालाच काय असा प्रश्न उपस्थित होत आहे.प्राप्त माहितीनुसार, कारंजा (घा.) तालुक्यातील नारा येथील शेतकरी रमेश बनसोड यांच्याकडे अडीच एकर शेती आहे. त्यांनी सन २००८ मध्ये पीककर्ज घेतले. आर्थिक परिस्थिती नाजूक असल्याने आणि निसर्गानेही साथ न दिल्याने तेव्हापासून ते कर्जाची परतफेड करू शकले नाही. सरकारने कर्जमाफी जाहीर केली. मात्र, त्याचा प्रत्यक्ष लाभ या शेतकऱ्याला मिळाला नसल्याने बँकेनेही पुन्हा शेतीसाठी कर्ज दिले नाही.कसेबसे स्वत:चे आणि कुटुंबाचे पोट भरणे सुरू असताना मुलाला कर्करोगाने ग्रासले. याच आजाराने मुलाचा मृत्यू झाला. मुलाच्या उपचारासाठी हातचा मोठा पैसाही निघून गेला. अशातच नवीन खरीप हंगाम तोंडावर असताना पूर्वीचे कर्ज फेडले नसल्याने बँकही पीककर्ज देण्यास तयार नाही. परिणामी, बियाणे आणावे कुठून असा प्रश्न सतावत असताना या शेतकऱ्याने पत्नीचे दागिणे गहाण ठेऊन बियाण्यांसह खताची खरेदी करून कपाशीच्या पेरणीला सुरूवात केली आहे.स्वत:च ओढतो काकरीपत्नीचे दागिणे गहाण ठेऊन बियाणे व खताची खरेदी करण्यात आली. पण आता बियाण्यांची लागवड करण्यासाठी बैलजोडी नसल्याने आणि किरायाने आणलेल्या बैलजोडीचा मोबदला देण्यासाठी पैसे नसल्याने शेतकरी रमेश याने स्वत: काकरी बनवली. शिवाय तो ही काकरी स्वत: ओढून पत्नी व पुतण्याच्या सहाय्याने कपाशीची लागवड करीत आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती