शेतकऱ्याने साडेतीन एकरातील सोयाबीनवर चालविला रोटाव्हेटर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2019 06:00 AM2019-11-22T06:00:00+5:302019-11-22T06:00:12+5:30

कारंजा (घा.) तालुक्यातील गवंडी येथील शेतकरी घनश्याम बारंगे यांनी सहा एकरात यावर्षी सोयाबीनची पेरणी केली होती. यावर्षीच्या अतिपावसाने आधीच शेतकरी संकटात असताना ऐन सोयाबीन काढणीच्या वेळी परतीच्या पावसाने हजेरी लावली. त्यामुळे सोयाबीन कापणी रखडल्याने शेतात साडेतीन एकरातील सोयाबीन कुजले. त्यातून उत्पादन खर्चही भरून निघणार असल्याने घनश्याम बारंगे यांनी साडेतीन एकरातील सोयाबीनवर रोटावेटर चालविला.

The farmer runs a three and a half acre soybean rotavator | शेतकऱ्याने साडेतीन एकरातील सोयाबीनवर चालविला रोटाव्हेटर

शेतकऱ्याने साडेतीन एकरातील सोयाबीनवर चालविला रोटाव्हेटर

Next
ठळक मुद्देसोयाबीन कुजले, कपाशीला बोंडच नाही : कारंजा तालुक्यातील गवंडी येथील वास्तव

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : सुरुवातीपासूनच पावसाने शेतकऱ्यांची पाठ सोडली नाही. त्यात परतीच्या पावसानेही चांगला दणका दिल्याने तोंडाशी आलेले सोयाबीन शेतातच कुजले. कपाशीचीही जोमाने वाढ झाली पण; बोंड नगण्यच. त्यामुळे नुकसान भरपाईकरिता शेतकऱ्यांनी तहसीलदारांकडे तक्रार केली. मात्र २८ जुलै रोजी तालुक्यात १०३ पावसाची नोंद असतानाही कारंजा तालुक्यात अतिवृष्टी झालीच नसल्याचा कांगावा करीत तालुका प्रशासनानेही दुर्लक्ष केले. परिणामी, हतबल झालेल्या गवंडी येथील एका शेतकºयाने साडेतीन एकरातील सोयाबीनवर रोटाव्हेटर चालविले. तर दुसऱ्या शेतकऱ्याने कपाशीच उपटून टाकल्याच वास्तव पुढे आलं आहे.
कारंजा (घा.) तालुक्यातील गवंडी येथील शेतकरी घनश्याम बारंगे यांनी सहा एकरात यावर्षी सोयाबीनची पेरणी केली होती. यावर्षीच्या अतिपावसाने आधीच शेतकरी संकटात असताना ऐन सोयाबीन काढणीच्या वेळी परतीच्या पावसाने हजेरी लावली. त्यामुळे सोयाबीन कापणी रखडल्याने शेतात साडेतीन एकरातील सोयाबीन कुजले. त्यातून उत्पादन खर्चही भरून निघणार असल्याने घनश्याम बारंगे यांनी साडेतीन एकरातील सोयाबीनवर रोटावेटर चालविला. डोेळ्यादेखत मेहनतीने फुलविल्या पिकावर रोटाव्हेटर चालविताना पापण्याआड पाणी तरळत होते. हीच परिस्थिती कपाशीचीही झाली आहे. कपाशी दुरुन उंच आणि हिरवीगार दिसत असली तरी आत गेल्यानंतर मोजकेच बोंड दिसत असल्याने कपाशीच्या उत्पादनाचाही भरवसा राहिला नाही. म्हणून काही शेतकऱ्यांनी आता पऱ्हाटी उपटण्याचाही निर्णय घेतला आहे. तालुक्यात अतिवृष्टी असतानाही प्रशासनाने पीक परिस्थिती उत्तम असल्याचे दाखवून शेतकऱ्यांच्या जखमेवर मिठ चोळले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना सरसकट मदत जाहीर करण्याची मागणी देविदास घागरे, घनश्याम बारंगे व पिंटू डोबे आदी शेतकºयांनी केली आहे.

जिल्ह्याला मिळाले ४० लाख
ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात झालेल्या ‘क्यार’ व ‘महा’ चक्रीवादळामुळे आलेल्या अवेळी पावसाने शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे नुकसानग्रस्त भागातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई, जमिन महसुलात सूट, शाळा व महाविद्यालयीन परीक्षा शुल्कात माफी आदी विविध सवलती देण्याच्या उद्देशाने शासनाकडून वर्धा जिल्ह्याला ४० लाख २५ हजार रुपयाचा निधी प्राप्त झाला आहे. विशेषत: प्रत्यक्षात नुकसान जास्त असल्याची वास्तव परिस्थिती आहे.

Web Title: The farmer runs a three and a half acre soybean rotavator

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.