शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

अखेर नागरिकांनी बुजबिला खड्डा

By admin | Updated: September 9, 2014 00:34 IST

कित्येक दिवसांपासून वर्धा-पवनार मार्गादरम्यान दत्तपूर परिसरात रस्ता उखडल्याने पडलेला दहा ते बारा फुटाचा खड्डा अपघातास कारणीभूत ठरत आहे. तरीही प्रशाला जाग येत नसल्याने अखेर

वर्धा : कित्येक दिवसांपासून वर्धा-पवनार मार्गादरम्यान दत्तपूर परिसरात रस्ता उखडल्याने पडलेला दहा ते बारा फुटाचा खड्डा अपघातास कारणीभूत ठरत आहे. तरीही प्रशाला जाग येत नसल्याने अखेर सोमवारी पवनार येथील काही नागरिकांनी पुढाकार घेत स्वत: गिट्टी, विटा, चुरी आणून तो खड्डा बुजविला. रविवारपासून गणेश विसर्जनाला सुरुवात झाली. त्यामुळे पवनारकडे जात असलेल्या रस्त्यावर दुचाकीसह चारचाकी वाहनांची वर्दळ होती. पावसामुळे दत्तपूर परिसरात रस्त्यावर आठ ते दहा फुटाचे एक मोठे भगदाड पडले आहे. बांधकाम विभागाद्वारे हा खड्डा लवकरात लवकर बुजविल्या जाणे गरजेचे असतानाही त्याकडे सोयिस्करपणे दुर्लक्ष केले जात आहे. सततच्या पावसामुळे हा खड्डा पाण्याने भरत असल्याने तो ये जा करीत असलेल्या नागरिकांना दिसत नाही. परिणामी दुचाकीस्वारांचे अपघात आता नित्याचेच झाले आहे. शेवटी गणेशविसर्जनासाठी जाताना नागरिकांना होत असलेला त्रास लक्षात घेत पवनार येथील काही नागरिकांनी स्वखर्चाने विटा, गिट्टी, चुरी असे साहित्य आणून हा खड्डा बुजविला. यासंदर्भात संबंधित विभागाला वारंवार कळविण्यात आले आहे. तसेच हा खड्डा किती धोकादायक आहे याची जाणीवही वेळोवेळी नागरिकांद्वारे करून देण्यात आली आहे. तरीही प्रशासनाद्वारे दुर्लक्ष केले जात असल्याने प्रवासी वर्गातून संताप व्यक्त केला जात आहे. हा खड्डा बुजविण्यासाठी पवनार येथील नरेश बावणे, रुकेश बावणे, प्रमोद नगराळे, अनिल नगराळे, राजू ठाकूर आदींनी पुढाकार घेतला. स्वत: नागरिकच पुढाकार घेत आहे हे पाहून ये जा करीत असलेल्या गणेशभक्तांचे हातही सरसावले. आणि त्यांनीही खड्डा बुजविण्यासाठी मदत केली. या खड्ड्यामुळे गत महिनाभरात चार ते पाच अपघात झाले आहे. रात्री या मार्गावर अवजड वाहने धावत असतात. खड्डा चुकविण्याच्या नादात ते समोरून येत असलेल्या वाहनावर आदळत असल्याने अपघात होत आहे. रविवारीच गणपती शिवायला गेलेल्या चौघांचा अपघात झाला. त्यामुळे पक्की डागडुजी होणे गरजेचे आहे.(शहर प्रतिनिधी)