शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

टिळकांच्या पुतळ्याचाही गुदमरत असेल श्वास!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2020 05:00 IST

पावसाळापूर्व नियोजनासाठी पालिका प्रशासनाकडून मोहीम शहरातील नाले, गाळ उपसा आदी मोहीम राबविण्यात येत असली तरी गोलबाजार परिसरात असलेल्या टिळकांच्या पुतळ्याकडे मात्र, पालिका प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष दिसून येत आहे. बाजारात भाजी खरेदी करण्यासाठी येणाऱ्यांकडून पुतळ्यासमोरच कचरा फेकल्या जातो, पाण्याचे डबके साचले असून जनावरे पाण्यात बसून असतात.

ठळक मुद्देगोल बाजारात सर्वत्र घाणीचे साम्राज्य : पालिकेची ‘हाताची घडी तोंडावर बोट’

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शहरातील गोल बाजार परिसरात असलेल्या टिळकांच्या पुतळ्या सभोवताल सर्वत्र घाणीचे साम्रज्य पसरले असून नगर पालिकेची ‘हाताची घडी तोंडावर बोट’ अशी भूमीका दिसून येत आहे. साचून असलेल्या कचऱ्यामुळे टिळकांचाही श्वास गुदमरत असेल, असे चित्र पहावयास मिळत आहे.पावसाळापूर्व नियोजनासाठी पालिका प्रशासनाकडून मोहीम शहरातील नाले, गाळ उपसा आदी मोहीम राबविण्यात येत असली तरी गोलबाजार परिसरात असलेल्या टिळकांच्या पुतळ्याकडे मात्र, पालिका प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष दिसून येत आहे. बाजारात भाजी खरेदी करण्यासाठी येणाऱ्यांकडून पुतळ्यासमोरच कचरा फेकल्या जातो, पाण्याचे डबके साचले असून जनावरे पाण्यात बसून असतात. असे विदारक चित्र येथे पहावयास मिळत आहे. एरव्ही शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्याचे आवाहन करणाऱ्या नगर पालिकेला स्वच्छतेचा विसर पडल्याचे दिसून येत आहे. गोल बाजार परिसरातून जाताना दुर्गंधी येत असलेल्या बाजारात जाणाऱ्यांना नाकावर रुमाल ठेवून भाजी खरेदी करावी लागत आहे. याचा नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.भाजीविक्रेतेही आपला सडलेला, कुजलेला भाजीपाला टिळकांच्या पुतळ्या समोर असलेल्या मोकळ्या जागेत फेकत असल्याने प्रचंड दुर्गंधी सुटली आहे. कचरा फेकणाऱ्यांना कुणाचीही भीती नसल्याचे चित्र आहे. हम करे सो कायदा याप्रमाणे भाजीविक्रेत्यांकडून सर्रास कचरा फेकल्या जात आहे. मात्र, कुंभकर्णी झोपेत असलेल्या पालिका प्रशासनाने जागे होण्याची गरज निर्माण झाली आहे.कचरा साचल्याने परिसराची साफसफाई करागोल बाजार परिसरात असलेल्या टिळक पुतळा परिसरात नागरिक लघुशंकेला जातात. तसेच साचून असलेला कचरा कुजून सडलेल्या भाजीपाल्याने दुर्गंधी सुटली आहे. त्यामुळे परिसरात स्वच्छता मोहीम राबवून पुतळा परिसरात साफसफाई करण्याची मागणी परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.जयंती, पुण्यतिथीलाच येते जागनगर पालिका प्रशासनाला केवळ टिळकांच्या जयंती आणि पुण्यतिथीलाच जाग येत असून त्याच दिवशी पुतळा परिसरात साफसफाई करून पुतळा स्वच्छ करण्यात येतो, पण त्यानंतर पालिकेला पुतळा आणि सभोवतालचा परिसरा साफ करण्याचा विसर पडत असल्याचा आरोप तेथील काही भाजीविक्रेते आणि नागरिकांनी केला आहे. त्यामुळे याकडे लक्ष देण्याची गरज आहे.परिसरात सुटली दुर्गंधीगोल बाजार परिसरातील टिळक पुतळ्यासमोर कुजलेल्या, सडलेल्या भाजीपाला आणि कचऱ्यामुळे दुर्गंधी सुटली आहे. त्यामुळे बाजारात येणाºया नागरिकांना नाकावर रुमाल ठेवून भाजीविक्री व इतर साहित्य खरेदी करावी लागत आहे. त्यामुळे त्यांच्या आरोग्याचा प्रश्न बिकट झाला आहे.पावसाळापूर्व नियोजन फेलपावसाळ्यापूर्वी शहरातील कचरा, नाले साफसफाई, गाळ उपसा आदी कामे नगर पालिकेकडून करण्यात येते. पण, शहरातील वर्दळीच्या असलेल्या बाजारातील घाणीचा विळखा पाहून पालिकेचे पावसाळापूर्व नियोजन फेल ठरल्याचे नागरिकांकडून बोलल्या जात आहे.

टॅग्स :Rainपाऊस