शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
2
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
3
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
4
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
5
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
6
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
7
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
8
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
9
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
10
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
11
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
12
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
13
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
14
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
15
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
16
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
17
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
18
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
19
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
20
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
Daily Top 2Weekly Top 5

‘संस्कारात वाढलेली मी’ विषयावर सखींकरिता निबंध स्पर्धा

By admin | Updated: May 17, 2014 23:50 IST

लोकमत सखी मंच वतीने ‘संस्कारात वाढलेली मी’ या विषयावर आत्मनिवेदनपर निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. यात निवड झालेल्या निबंधाकरिता आकर्षक बक्षीस दिली जाणार आहे

वर्धा : लोकमत सखी मंच वतीने ‘संस्कारात वाढलेली मी’ या विषयावर आत्मनिवेदनपर निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. यात निवड झालेल्या निबंधाकरिता आकर्षक बक्षीस दिली जाणार आहे. आपण कशा प्रकारच्या वातावरणात संस्कारात वाढलो हे नेहमी आपल्याला सर्वांना सांगावेसे वाटते. संस्कारांचे, अनुभवांचे महत्त्व, त्यामुळे आयुष्यात झालेला बदल, जीवनात काहीतरी शिकवून गेलेले प्रसंग, असा खुप मोठा साठा सखींच्या मनात असतो. प्रत्येक वेळी ते व्यक्त करण्याची, बोलण्याची संधी मिळतेच असे नाही. मग हे व्यक्त होणं स्वत: पुरतंच मर्यादीत राहतं. सखींमध्ये लेखन कौशल्याचेही सुप्त गुण आहेत. ते सखी मंचच्या या त्यांच्या हक्काच्या व्यासपीठावर यावेत यासाठी फक्त सखी मंच सदस्यांकरिता सदर निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. यात सखींना आपला विषय हा सुमारे ४०० ओळीत मांडायचा आहे. निबंध घरूनच लिहून आणावयाचा असून लिहलेला निबंध एका बंद पाकिटात स्वत:चा नाव, पत्ता, फोन नं. व सखी मंच सदस्यता क्रमांक हा तपशील लिहून सखी मंच कार्यालयात २६ ते ३१ मे या कालावधीत आणून द्यायचा आहे. या स्पर्धेकरिता प्रवेश शुल्क प्रत्येकी २० रुपये असे आहे. सखींनी प्रवेश शुल्क आपल्या निबंधाबरोबरच कार्यालयात जमा करावयाचे आहे. यापैकी उत्कृष्ट निबंधास सखी मंच तर्फे प्रथम, द्वितीय, तृतीय व प्रोत्साहनपर बक्षीस व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. निबंध हा स्वच्छ, सुटसुटीत, निटनेटका लिहलेला असावा. वाचनीय काही निबंधाचा उल्लेख व बक्षीस वितरण पुढील कार्यक्रमात रीतसर करण्यात येईल. स्पर्धेतील विजेत्यांची नावे वर्तमानपत्रात जुन महिन्याच्या दुसर्‍या आठवड्यापर्यंत प्रसिद्ध करण्यात येईल. परीक्षकांचा निर्णय हा अंतिम राहील. सखींना सदर स्पर्धेत सहभाग घेवून आपले लेखन कौशल्य यातून व्यक्त करावे, असे आवाहन केले आहे. अधिक माहितीकरिता ९४२२९०४८६७ क्रमांकावर सकाळी ११ ते ५ या वेळात संपर्क साधावा.(उपक्रम प्रतिनिधी)