अडसर ठरणारे अतिक्रमण अखेर हटविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2020 06:00 AM2020-02-22T06:00:00+5:302020-02-22T06:00:08+5:30

राजाश्रय असलेल्या काहींनी नगर पंचायतीच्या रस्त्यावर अतिक्रमण केले होते. त्या अतिक्रमणामुळे विकास कामे ठप्प झाली होती. अतिक्रमणामुळे प्रभाग क्रमांक ५ मधील नालीचे बांधकाम अर्ध्यावरच थांबले होते. काही मुजोर लोकांच्या कृतीने रस्ते व नाली बांधकाम प्रभावित झाले होते. नगरसेविकेचे अतिक्रमण असल्याचा कांगावा करित स्वताचे अतिक्रमण काढण्यास विरोध केला जात होता.

The encroachments were eventually removed | अडसर ठरणारे अतिक्रमण अखेर हटविले

अडसर ठरणारे अतिक्रमण अखेर हटविले

Next
ठळक मुद्देमुख्याधिकाऱ्यांची कारवाई : नगरसेविकेने स्वत:हून काढले अतिक्रमण

लोकमत न्यूज नेटवर्क
सेलू : नाली व रस्त्याच्या बांधकामात अडसर ठरत असलेल्या अतिक्रमणावर अखेर नगर पंचायतीने गजराज चालविला. अनेकांनी अतिक्रमण केल्याने विकासकामे ठप्प झाली होती. शेवटी मुख्याधिकारी यांनी राजकारण्यांचा दबाव झुगारून अतिक्रमण काढण्याची कारवाई केली.
राजाश्रय असलेल्या काहींनी नगर पंचायतीच्या रस्त्यावर अतिक्रमण केले होते. त्या अतिक्रमणामुळे विकास कामे ठप्प झाली होती. अतिक्रमणामुळे प्रभाग क्रमांक ५ मधील नालीचे बांधकाम अर्ध्यावरच थांबले होते. काही मुजोर लोकांच्या कृतीने रस्ते व नाली बांधकाम प्रभावित झाले होते. नगरसेविकेचे अतिक्रमण असल्याचा कांगावा करित स्वताचे अतिक्रमण काढण्यास विरोध केला जात होता. शेवटी नगरसेविकेंनी विकास कामात अडसर ठरणाऱ्यांचे तोंड चूप करण्यासाठी अतिक्रमण नसतांनाही स्वतच्या घराची संरक्षक भिंत तोडली. मुख्याधिकारी कांचन गायकवाड, प्रशासनिक अधिकारी रघुनाथ मोहीते, अभियंता दीपक देवकते यांनी स्वत: उभे राहून रस्त्यावर आलेले अतिक्रमण काढले. उर्वरित अतिक्रमण अजून जैसे थेच असून त्यावर कधी कारवाई होणार असा संतप्त सवाल नागरिकांकडून केला जात होता.

Web Title: The encroachments were eventually removed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.