शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
4
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
5
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
6
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
7
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
8
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
9
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
10
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
11
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
12
‘धुरंधर’चा वाद सामंजस्याने सोडवावा, दिग्दर्शक आदित्य धर, निर्मात संतोष कुमार यांना उच्च न्यायालयाच्या सूचना
13
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
14
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
15
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
16
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
17
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
18
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
19
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
20
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांपेक्षा अकरावीच्या जागाच अधिक

By admin | Updated: June 19, 2016 01:47 IST

दहावीच्या निकालानंतर विद्यार्थ्यांसह पालकांना वेध लागतात ते प्रवेश मिळविण्याचे.

विद्यार्थी १५ हजार ८३० : जागा २० हजार ८००, कॉलेजचीच धावाधावश्रेया केने  वर्धादहावीच्या निकालानंतर विद्यार्थ्यांसह पालकांना वेध लागतात ते प्रवेश मिळविण्याचे. अकरावीतील प्रवेशासाठी कनिष्ठ महाविद्यालयापुढे तासन्तास रांगेत उभे राहणाऱ्या विद्यार्थ्यांना यंदा मात्र याची गरज भासणार नाही. जिल्ह्यात १५ हजार ८३० विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा उत्तीर्ण केली असून अकरावीकरिता २० हजार ८०० जागा आहेत. त्यामुळे ५ हजार जागा रिक्त राहण्याची शक्यता असल्याने विद्यार्थ्यांकरिता कॉलेजचीच धावाधाव होणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.जिल्ह्यात १३० कनिष्ठ महाविद्यालयांची संख्या असून २०८ तुकड्या आहेत. ज्या महाविद्यालयात पदवीच्या शिक्षणाची सुविधा आहे त्या महाविद्यालयात १०० तर ज्या महाविद्यालयात केवळ बाराव्या वर्गापर्यत शिक्षणाची सुविधा आहे त्या महाविद्यालयात ६० प्रवेशाची मुभा आहे. यात प्रत्येक महाविद्यालय शिक्षण उपसंचालकांकडून २० जागा या वाढीव मागत असतात, यामुळे जिल्ह्याची प्रवेश क्षमता २० हजार ८०० पर्यंत आाहे. यातही नामांकित महाविद्यालयांत प्रवेश घेण्याकरिता विद्यार्थ्यांसह पालकही प्रयत्नरत असतात. अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेला प्रारंभ झाला असून याचे वेळापत्रक माध्यमिक शिक्षण विभागाने जाहीर केले. यातून प्राप्त झालेल्या अर्जाच्या छाननीनंतर गुणवत्ता यादी जाहीर करून त्यानुसार प्रवेश दिल्या जातो. प्रवेशाकरिता महाविद्यालयांपुढे पालक व विद्यार्थ्यांच्या रांगा पाहायला मिळतात. दरवर्षी अकरावीच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची झुंबड उडते. शाळा-महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी धडपड सुरू असते. यंदा मात्र हे चित्र पालटण्याचे चिन्ह आहे. परीक्षा उत्तीर्ण केलेल्या विद्यार्थ्यांपेक्षा कनिष्ठ महाविद्यालयांची प्रवेश क्षमता अधिक आहे. त्यामुळे पाच हजार जागा रिक्त राहणार असल्याचे आकडेवारीवरुन दिसून येते. या रिक्त जागा भरण्याकरिता महाविद्यालयांचीच आता धावाधाव होणार असल्याची चिन्हे जिल्ह्यात दिसत आहेत. शाखानिहाय प्रवेश क्षमताकला, वाणिज्य, विज्ञान व किमान कौशल्यावर आधारित अभ्यासक्रम अशा चार शाखांमिळून असलेल्या १३० महाविद्यालयात २० हजार ८०० विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतात. यात अनुदानित व विनाअनुदानित अशा २०८ तुकड्या आहेत. कला शाखेत ९४ तुकड्या अनुदानित तर २० विना अनुदानित आहे. विज्ञान शाखेत २० अनुदानित तर ३८ विनाअनुदानित आहे. वाणिज्य शाखेत २० अनुदानित आणि १६ विना अनुदानित आहेत. अनुदानित आणि विना अनुदानित तुकड्यांची प्रवेश क्षमता पाहता २० हजार विद्याथी यात प्रवेशित होऊ शकतात; मात्र दहावी परीक्षा उत्तीर्ण करणारे विद्यार्थी संख्या १५ हजार ८०० आहेत. तंत्रनिकेतन, आयटीआयच्या जागा वेगळ्याच या उत्तीर्ण विद्यार्थ्यांपैकी काही विद्यार्थी तंत्रनिकेतन, आयटीआय येथे प्रवेश घेतात. तसेच काही विद्यार्थी जिल्ह्याबाहेर शिक्षण घेण्यासाठी जातात. त्यामुळे ५ हजाराहून अधिक जागा रिक्त राहण्याची शक्यता आहे.