शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

वीज तारांच्या स्पर्शाने बैलजोडी ठार

By admin | Updated: June 19, 2016 01:59 IST

शेतात वखरणीचे काम सुरू असताना शेतात पडून असलेल्या जिवंत विद्युत तारांना बैलजोडीचा स्पर्श झाला.

रिधोरा येथील घटना : शेतकऱ्याचे ७० हजारांचे नुकसानसेलू : शेतात वखरणीचे काम सुरू असताना शेतात पडून असलेल्या जिवंत विद्युत तारांना बैलजोडीचा स्पर्श झाला. यात दोन्ही बैलांचा जागीच मृत्यू झाला. यावेळी काम करीत असलेल्या इसम थोडक्यात बचावला. ही घटना शनिवारी सकाळी १० वाजता तालुक्यातील रिधोरा येथे घडली.मनोहर सावरकर यांनी मौजा रिधोरा येथील अशोक श्रीराम यांचे शेत ठेक्याने केले होते. शुक्रवारी रात्री वादळी वाऱ्यासह पावसाचे आगमन झाले. यामुळे सकाळी शेतात सारण्या फाडण्याच्या कामासाठी तो शेतात बैलजोडी घेऊन गेला होता. शेतात जिवंत विद्युत तारा पडून असतील, याची त्याला पुसटशी कल्पनाही नव्हती. यामुळे काम करीत असताना बैलांचा स्पर्श वीज तारांना झाला. यात बैलजोडी घटनास्थळीच ठार झाली. वखरणीचे काम करणारा भैया कुडसंगे हा मात्र थोडक्यात बचावला. ऐन हंगामात घडलेल्या या घटनेमुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. बैलजोडी ठार झाल्याने शेतकऱ्याचे ७० हजार रुपयांचे नुकसान झाले. या शेतकऱ्याला महावितरण कंपनीने त्वरित मदत द्यावी, अशी माणगी शेतकऱ्यांतून होत आहे.(तालुका प्रतिनिधी)जिल्ह्यात सरासरी १९.३९ मिमी पाऊसजिल्ह्यात शुक्रवारी सर्वत्र पावसाचे आगमन झाले. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. सरासरी १९.३९ मिमी पावसाची नोंद करण्यात आली असून एकूण १५५.१० मिमी पाऊस झाला आहे. यात वर्धा तालुक्यात १० मिमी, सेलू २५, देवळी ८.२०, हिंगणघाट ८.१०, समुद्रपूर १०.४०, आर्वी ३०, आष्टी ४२ आणि कारंजा तालुक्यात २१ मिमी पावसाची नोद करण्यात आली. शुक्रवारचा पाऊस जिल्ह्यात सर्वत्र कोसळल्याने शेतातील कामांना वेग आल्याचे दिसून येत आहे. असे असले तरी पेरणीकरिता दमदार पावसाची गरज व्यक्त होत आहे.