शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
2
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
3
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
4
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
5
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
6
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
7
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
8
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
9
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
10
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
11
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
12
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
13
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
14
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
15
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
16
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
17
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
18
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
19
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
20
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षण समिती म्हणते, निर्णयावर ठाम

By admin | Updated: August 23, 2015 02:17 IST

सध्या जिल्ह्यात गाजत असलेल्या जिल्हा परिषदेतील कथित शिक्षक बदली घोटाळ्यावरून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडणे सुरू झाले आहे.

शिक्षक बदली घोटाळा : विभागीय आयुक्तांकडे दाद मागणार-भेंडेवर्धा : सध्या जिल्ह्यात गाजत असलेल्या जिल्हा परिषदेतील कथित शिक्षक बदली घोटाळ्यावरून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडणे सुरू झाले आहे. शिक्षण समितीने जिल्ह्यातील १० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांतील शिक्षकांना पटसंख्या अधिक असलेल्या शाळांमध्ये तात्पूरती व्यवस्था म्हणून पाठविल्याचा पुनरुच्चार करीत याप्रकरणी विभागीय आयुक्तांकडे दाद मागणार असल्याची माहिती शिक्षण समिती सभापती मिलिंद भेंडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.जिल्ह्यातील शाळा व्यवस्थापन समिती, जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांनी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून अशी मागणी केली होती. यानुसार ही पदस्थापना करण्यात आली आहे. मागील अनेक मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या काळात अशा स्वरुपाचे आदेश झालेले आहे. ही बाब याच आधारावर करण्यात आली, याकडेही भेंडे यांनी लक्ष वेधले.शिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी व केंद्र प्रमुखांच्या जॉब चार्टमध्ये अशा पदस्थापना करण्याची बाब नमूद आहे. याअनुषंगाने शिक्षण समितीने ठराव घेऊन जिल्ह्यातील ३९ शिक्षकांची पदस्थापना तात्पूरत्या स्वरुपात केली. याबाबत कुणाचीही तक्रार नाही. मात्र एका महिला मुख्याध्यापिकेच्या तक्रारीवरून ही कार्यवाही करण्यात आली. सदर मुख्याध्यपिका तीनदा निलंबित झाल्याचा आरोपही भेंडे यांनी केला.अपंग समावेशित शिक्षण भरती प्रक्रियेशी नाहक आपला संबंध जोडला जात आहे. ही बाब पूर्णत: प्रशासकीय आहे. या विषयाची आपणाला काहीही माहिती नसल्याचेही सभापती भेंंडे यांनी स्पष्ट केले. विद्यार्थ्यांच्या हितासाठी अनेक चांगले निर्णय शिक्षण समितीने घेतले. त्यामुळे जिल्ह्यातील शैक्षणिक वातावरण चांगले झालेले आहे. अशात कोणतेही आरोप झाले तरी आपले काम यापुढेही सुरूच राहील व संघर्ष करीत राहू, अशा शब्दात त्यांनी आपल्यावरील आरोप फेटाळले.(जिल्हा प्रतिनिधी)