शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
2
Top Marathi News LIVE Updates: १८-१९ एप्रिलपर्यंत उन्हाच्या झळा, नंतर पावसाच्या सरी! काळजी घ्या...
3
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
4
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
5
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
6
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
7
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
8
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
9
"दोन घटस्फोट, जुळ्या मुलींचा जन्म...", धर्मांतर केल्याने ट्रोल झालेली अभिनेत्री; आता म्हणाली...
10
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
11
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
12
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
13
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
14
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
15
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
16
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
17
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
18
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
19
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
20
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
Daily Top 2Weekly Top 5

थंडीच्या महिन्यातही पारा ३१ अंशावरच

By admin | Updated: November 5, 2016 00:56 IST

दिवाळीच्या काळ थंडीचा म्हणून ओळखला जातो, असे असताना वर्धेत नोव्हेंबर महिना उगविला तरी पारा ३१ अंशावरच आहे.

दिवसा उकाडा रात्री थंडी : वर्धेकरांना थंडीची प्रतीक्षामहेश सायखेडे  वर्धादिवाळीच्या काळ थंडीचा म्हणून ओळखला जातो, असे असताना वर्धेत नोव्हेंबर महिना उगविला तरी पारा ३१ अंशावरच आहे. यामुळे दिवसा उकाडा आणि रात्रीला थोडी थंडी असे काहीचे वातावरण वर्धेंकरांना अनुभवायला येत आहे. असे असले तरी यंदा जिल्ह्यात थंडीची चांगलीच हुडहुडी भरणार असल्याचे बोलले जात आहे. याच गुलाबी थंडीच्या प्रतीक्षेत असलेल्यांनी गत आठ महिने आलमारीत ठेवले जाणारे गरम कपडे बाहेर काढले आहे. आॅक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात व नोव्हेंबरमध्ये अपवादात्मक तापमान ३१ अंशावर जाते. परंतु, यंदा ४ नोव्हेंबर रोजी ३२ अंश इतकी कमाल तापमानाची नोंद होत आहे. दिवसा अंगाला चटके देणारी ऊन्ह तर रात्री थंडी जाणवत आहे. याचा विपरीत परिणाम आरोग्यावर होत आहे. यामुळे सर्दी, खोकला आदी आजारांच्या रुग्णात वाढ होत आहे. परिणामी रुग्णालये फुल्ल दिसत आहे. जिल्ह्यात किमान तापमान घसरत असल्याचे दिसून येते. यामुळे थोड्या प्रमाणात थंडी जाणवत आहे. ही थंडी गरम कपडे घालण्याइतपत नसल्याचे बोलले जात आहे. शहरी भागात नसली तरी ग्रामीण भागात थोड्या प्रमाणात थंडी जाणवत असल्याचे चित्र आहे. सध्या शेतात उत्पन्न निघत आहे. तर काहींच्या शेतात ते उभे आहे. यामुळे शेतकरी शेतात जागलीला जात आहे. येथे थंडीची कुडकुड जाणत असल्याने शेकोटीचा आसरा घेत असल्याचे चित्र आहे. सध्या रात्रीचे तापामन गडगडत असल्याने तापमानात कमालीची घट होत असली तरी हुडहुडीला अजून प्रतीक्षा वर्धेकरांना करावी लागणार असल्याचे दिसते.तूर पिकासाठी थंडी फायदेशीर, पण ढगाळ वातावरणाचे सावटजिल्ह्यात खरीपात सोयाबीन, तूर, कपाशी तर रब्बी हंगामात गहू व चन्याचे मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात येते. अनेक शेतात सध्या तुरीचे पीक मोठ्या प्रमाणात आहे. सध्या पडत असलेल्या थंडीचा लाभ या तुरीच्या पिकाला होणार आहे. थंडीमुळे या पिकांची जोमात वाढ होत असल्याचे शेतकरी सांगतात.ढगाळ वातावरणामुळे तुरीवर अळीचा प्रकोपथंडीचा जोर वाढत असताना अचानक गत दोन दिवसांपासून आकाशात काही प्रमाणात ढगाळी वातावरण येत आहे. याचा विपरीत परिणाम तुरीवर होत असून अळीरचा हल्ला होत असल्याचे दिसून येत आहे. सध्या रात्रीला थंडी पडत असून त्याचा लाभ तुरीला होईल असे वाटत असताना या ढगाळ वातावरणामुळे धोक्याचे सावट घोंगावत आहे.