शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

डाळी कडाडल्याने सर्वसामान्यांना चिंता

By admin | Updated: June 13, 2015 02:09 IST

महागाईची झळ कमी होईल, असे सर्वसामान्यांना वाटत असताना त्याचे चटके अधिकच तीव्र होत आहे.

वर्धा : महागाईची झळ कमी होईल, असे सर्वसामान्यांना वाटत असताना त्याचे चटके अधिकच तीव्र होत आहे. जीवनावश्यक वस्तुंच्या किंमती गणाला भिडत असताना सर्वसामान्यांच्या जेवणात महत्त्वाचे असलेले वरणही गायब होण्याची वेळ आली आहे. वर्षभरात तुरीसह इतर डाळीच्या किंमती २० ते २५ रुपये प्रतिकिलोने वाढल्याने ‘दाल रोटी’ दुरापास्त होण्याची वेळ आली आहे.गत महिन्यात ८० ते ८५ रुपये किलोच्या घरात असलेली तुरीची डाळ आज १०० ते १२० रुपये किलोपर्यंत पोहोचली आहे. या पाठोपाठ इतर डाळीही भडकल्याने जेवणाच्या ताटातून डाळीचे पदार्थ नजेरआड होण्याची वेळ आली आहे. डाळीच्या वाढलेल्या किंमतीमुळे खर्चाचे बजेट बसविणे गृहिणींना अडचणीचे जात आहे. या तुलनेत कृषी उत्पन्न बाजार समितीत तुरीला त्या तुलनेत मिळणारा दर मात्र कमी आहे. तूर पिकवून आपला उदरनिर्वाह करणाऱ्या बळीराजालाही डाळीच्या वरणापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. डाळीच्या वाढलेल्या किंमतीचा फटका सर्वसामान्यांसह हॉटेल व्यावसायिकांनाही बसत बसल्याचे दिसून येत आहे. हॉटेलात सर्वात कमी खर्चाची भाजी म्हणून दालफ्रायकडे पाहिले जात होते. डाळीचे भाव वाढल्याने आज या डिशचे दर वाढले आहे. दर वाढले असून मिळणाऱ्या दालफ्रासमध्ये दाळ कमी व इतर मसालाच जास्त असल्याचे दिसत आहे. याला डाळींचे कडालेले भाव कारणीभूत असल्याचे बोलले जाते.शरीरात प्रथिनाची मात्रा सांभाळण्याकरिता जेवणात तुरीच्या डाळीच्या पदार्थांना विशेष महत्त्व आहे. या सोबतच इतर डाळींचा अंतर्भाव केला जातो. मात्र गत महिनाभरापासून वाढलेल्या या डाळीच्या दरामुळे नागरिकांच्या ताटातून डाळीचे पदार्थ नजरेआड होण्याची शक्यता बळावली आहे. रोजमजुरी करणाऱ्यांना तर तुरीची डाळ विकत घेणे शक्य नसल्याचे दिसते. राज्यात नवे शासन आल्याने महागाईचा वाढता आलेख कमी होईल असे सर्वसामान्यांना वाटत होते. मात्र महागाई कमी होण्यापेक्षा ती वाढतच असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. यामुळे सत्तेत असलेले शासन सर्वसामान्यांच्या नाही तर व्यापारी धार्जिने असल्याच्या प्रतिक्रीया सर्वसामान्यातून व्यक्त होत आहेत. महागाईच्या दिवसेंदिवस वाढत असलेल्या या बडग्यापासून नेमकी मुक्ती केव्हा मिळेल याची प्रतीक्षा कायमच असल्याचे दिसत आहे.(प्रतिनिधी)