शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

मद्यधुंद चालक बस सोडून पळाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2019 06:00 IST

तो मद्यधुंद अवस्थेत होता पण, प्रवाशांच्या लक्षात आले नाही. त्यानंतर हीच बस कारंजा येथून सावद, धावसा व गवंडी येथूनही जाऊन आली. त्यानंतर वर्धेकडे जायला निघाला असता तो मद्य प्राशन करुन असल्याचे प्रवाशांच्या लक्षात आले.

ठळक मुद्देप्रवाशांची ताटकळ। कारंजा बसस्थानकावरील प्रकार

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : तालुक्यातील परसोडी येथून विद्यार्थ्यांसह प्रवाशी घेऊन कारंजा बसस्थानकावर आलेल्या बसचा चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याचे प्रवाशांच्या लक्षात आले. त्यामुळे त्याला जाब विचारला असता चालकाने संधीसाधून तेथून पळ काढला. त्यामुळे प्रवाशांना बसस्थानकावरच ताटकाळत थांबावे लागले. हा प्रकार शनिवारी सकाळी कारंजा बसस्थानकावर घडल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे.तळेगाव आगाराच्या एमएच ४० एन ८४४५ क्रमांकाच्या बसचा चालक अमोल मांगे रा. वाठोडा हा शुक्रवारी रात्री कारंजा येथून परसोडीला गेला. शनिवारी सकाळी ही बस परसोडी येथून ७०-८० विद्यार्थ्यांसह प्रवाशी घेऊन कारंजा येथे पोहोचली. तेव्हाच तो मद्यधुंद अवस्थेत होता पण, प्रवाशांच्या लक्षात आले नाही. त्यानंतर हीच बस कारंजा येथून सावद, धावसा व गवंडी येथूनही जाऊन आली. त्यानंतर वर्धेकडे जायला निघाला असता तो मद्य प्राशन करुन असल्याचे प्रवाशांच्या लक्षात आले. प्रवाशांनी लगेच त्याला जाब विचारायला सुरुवात केल्याने त्याने पळ काढला. त्यामुळे संतप्त झालेल्या प्रवाशांनी वाहतूक नियंत्रण कक्षाला याची माहीती देत संताप व्यक्त केला.सावद व धावसा या गावी फेरी घेऊन जाण्यापूर्वी त्याने रक्तदाब कमी झाल्याबाबत वाहतूक नियंत्रकाला सांगितले होते. यापूर्वीही तो निलंबित झाला आहे. सोमवारी याबाबत अहवाल तयार करुन विभागीय वाहतूक अधीक्षकांकडे पाठवून त्याच्यावर योग्य कार्यवाही केली जाईल.एस.पी.पांडे, आगार व्यवस्थापक, तळेगाव

टॅग्स :state transportएसटी