शहरं
Join us  
Trending Stories
1
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
2
Video: "नरेंद्र मोदी हे दहशतवादी"; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचे धक्कादायक वक्तव्य, नंतर केली सारवासारव...
3
Mumbai Local: मोठा अपघात टळला! CSMT स्थानकात दोन लोकल समोरासमोर! सिग्नल बिघाड अन् मोटरमनचे प्रसंगावधान (Watch Video)
4
पाकिस्तानाचा विषारी डाव! फाजिल्कामध्ये काळवंडले नद्यांचे पाणी; पंजाबची जनता आजाराच्या विळख्यात
5
१० हजार+ धावा, १७५ विकेट्स, पण आयपीएलमध्ये ५ वर्षे बेंचवर बसून राहिला 'हा' अष्टपैलू खेळाडू
6
Narasimha Navratri 2026: नृसिंह नवरात्र विशेष: नऊ दिवस नऊ उपासना; संकटमुक्तीसाठी करा ही विशेष साधना!
7
भोंगळ कारभार! रुग्णालयात गर्दी वाढली, सुरक्षा रक्षक झाला 'डॉक्टर'; जखमी तरुणाला घातले टाके
8
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
9
हंगेरीची मोठी घोषणा! नेतन्याहूंना अटक करणार; नवीन पंतप्रधान पीटर माग्यार यांचा इस्रायलला मोठा इशारा
10
जगाची ‘लाईफलाईन’ धोक्यात? मलक्काच्या मार्गावर अमेरिकेचा पहारा, चीनची वाढली धडधड!
11
रिक्षा चालवून लेकाला डॉक्टर बनवण्याचं स्वप्न; वडिलांवर आली अंत्यसंस्कारासाठी पैसे मागण्याची वेळ
12
युद्ध की शांतता? मतभेद! संसदेचे सभापती आणि IRGC प्रमुखांमध्ये जुंपली; इराणचे नवे 'पॉवर सेंटर' अहमद वाहिदी कोण? 
13
Lori Deremer: देशावर युद्धाचं संकट, पण ट्रम्प सरकारची महिला मंत्री करत होती 'पूल पार्टी'
14
इराणची लेडी डॉन शमीम माफीला अमेरिकेत अटक, विमानतळावरच ठोकल्या बेड्या; प्रकरण काय?
15
Latest Marathi News LIVE Updates: चेन्नई सुपर किंग्जचा आयुष म्हात्रे दुखापतीमुळे IPL 2026 बाहेर
16
क्रिकेट इतिहासात शून्यावर बाद होणारा पहिला खेळाडू कोण? १४९ वर्षांपूर्वी नोंदवला गेला हा लाजीरवाणा विक्रम; कसा आला 'डक' शब्द? जाणून घ्या
17
खाडी देशांत युद्ध...! भारतीय पर्यटकांनी या देशांकडे वळविला आपला मोर्चा; उन्हाळ्यात तुम्ही कुठे जाणार?
18
धक्कादायक! रील बनवण्याची हौस जिवावर बेतली; बाईकवरून स्टंट करताना पडून ३ भावांचा मृत्यू
19
एकनाथ शिंदेंनी शब्द पाळला; पहलगाममध्ये आदिलच्या कुटुंबाला घर बांधून दिले, १२ लाख खर्च केले!
20
"चर्चा नाही तर मोठा धमाका करू!" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा; शांतता चर्चा धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामस्थांना ब्लिचिंगविना पिण्याचे पाणी

By admin | Updated: May 22, 2014 01:21 IST

पंचायत समितीअंतर्गत ग्रामपंचायतींमधील नागरिकांना भर उन्हाळ्यात ब्लिचिंगविना पाणी पिण्याची वेळ आली आहे.

सेलू : पंचायत समितीअंतर्गत ग्रामपंचायतींमधील नागरिकांना भर उन्हाळ्यात ब्लिचिंगविना पाणी पिण्याची वेळ आली आहे. याला सचिवांचे दुर्लक्षीतपण व सरपंचाचे अज्ञान कारणीभूत ठरत आहे.

उन्हाळ्याच्या दिवसात पाण्याच्या स्त्रोतांची खोली वाढली. अनेक ठिकाणी पाण्यासाठी बोंबा सुरु आहे. अनेकांचे नळ खड्डय़ात आहे. तेव्हा नळांना येणारे पाणी घेणे झाल्यावर त्या खड्डय़ातील दूषित झालेले पाणी पुन्हा नळाद्वारे परत जाते. अनेक ठिकाणी व्हॉल्व्ह व लिकेजमुळेही पाणी दूषित होते. अशावेळी नियमित पाण्यात ब्लिचिंग पावडर टाकावा, असा सूचना पंचायत समितीचे विस्तार अधिकारी (आरोग्य) ग्रामसेवकांना नियमित देतात. मात्र काही वेळकाढू ग्रामसेवक या गंभीर प्रश्नाकडे दुर्लक्ष करतात व ब्लिचिंग पावडर टाकत नाही. त्यामुळे ग्रामस्थांना ब्लिचिंगविना पाणी पिण्याची वेळ येते. लहानमोठय़ा आजाराचे रुग्ण यामुळे दवाखान्यात गर्दी करीत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

अनेक लहान ग्रामपंचायतींची आर्थिक परिस्थिती बेताची आहे अशा ग्रामपंचायतींसाठी पंचायत समितीच्या शेष फंडातून पन्नास टक्के अनुदानावर ब्लिचिंग पावडर पुरविल्या जाते. तालुक्यात असलेल्या ६२ ग्रामपंचायतींपैकी ४२ ग्रामपंचायतींना हे पावडर सद्या पुरविल्या गेले, मात्र यासाठी पंचायत समितीची तुटपूंजी आर्थिक तरतुदही धक्कादायकच आहे.

पंचायत समितीने शेष फंडातून पन्नास हजार रुपयांच्या ब्लिचिंग पावडरची खरेदी केली.यात ५५0 रुपये नगाप्रमाणे ३५ किलोच्या ६२ ब्लिचिंग पावडरच्या बॅग खरेदी केल्या. त्या ५0 टक्के अनुदानावर २७५ रुपये नगप्रमाणे ४२ ग्रामपंचायतींना दिल्या. काही ग्रा.पं.ना दोन तर काहींच्या वाट्याला एकच बॅग आली. ब्लिचींग पावडर नियमित टाकल्यावर तो किती दिवस पुरेल, हा प्रश्न आहे.

अनेक ग्रामपंचायत हे पावडर जास्त दिवस पुरले पाहिजे म्हणून नियमित टाकत नसल्याचे धक्कादायक चित्र आहे. उत्पनाच्या मोठय़ा ग्रामपंचायतींना शंभर टक्के रक्कम भरुन हे पावडर घ्यावे लागते. मात्र ते दर्जेदार व आयएसआय मार्क असावे, याची काळजी घेत ज्यांनी ७२ बॅग पुरविल्या. त्याच वितरकाकडून दर्जेदार पावडर देण्यासाठी पं.स.ने करारनामा केला. ज्या मोठय़ा उत्पन्नाच्या ग्रामपंचायती आहे. त्यांना ५५0 रुपये बॅगप्रमाणे हे ब्लिचिंग पावडर पुरविण्याचे धोरण असल्याचे सांगितले.

पावसाळा तोंडावर आहे. आर्थिक स्थिती खराब असलेल्या ग्रामपंचायतीकडे असलेले ब्लिचिंग पावडर संपणार आहे. सद्या अनेकाकडे साठाच उपलब्ध नाही. पंचायत समितीने केवळ शेषफंडातून पन्नास हजार एवढी तुटपूंजी तरतुद केली. आरोग्याच्या महत्त्वपूर्ण जिव्हाळ्याच्या विषयाबद्दल कुणाचीच गंभीरता दिसून येत नाही.(तालुका प्रतिनिधी)