शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दर ५३ मिनिटांनी एका चिमुकलीवर अत्याचार; नराधमांना कोण रोखणार?
2
Top Marathi News LIVE Updates: ५ राज्यांमध्ये 'सत्ता'धीश कोण?, आज होणार फैसला; पश्चिम बंगालकडे सगळ्यांचे लक्ष
3
आजचे राशीभविष्य, ०४ मे २०२६: मिथुन, वृश्चिक, मकर राशींना धनलाभाचे संकेत; कसा असेल तुमचा दिवस?
4
पाच राज्यांच्या भविष्याचा आज फैसला; प.बंगाल, तामिळनाडूच्या निकालावर नजरा
5
पाऊस चोरणारे देश? अमेरिका-इस्रायलवर 'ढगचोरी'चा खळबळजनक आरोप; प्रकरण काय?
6
राज्यात पहिलीपासून तिसऱ्या भाषेचा मुद्दा यंदाच्या वर्षी बारगळण्याची चिन्हे; डॉ. नरेंद्र जाधव समितीच्या अहवालावर निर्णय प्रलंबित
7
आधी नराधमाला फाशी द्या, मगच या...नसरापूरच्या पीडित पित्याचा संताप, न्यायाची केली मागणी; राजकीय नेत्यांच्या गर्दीने कुटुंब व्यथित
8
पाकिस्तान, चीन सीमेवर भारताची अहोरात्र ‘दृष्टी’; ‘गॅलेक्सआय’ या भारतीय स्टार्टअपचा उपग्रह लाँच
9
एसीच्या स्फोटाने आग; दिल्लीत ९ जणांचा मृत्यू; जळालेल्या आईच्या मिठीत होता मुलाचा मृतदेह
10
परीक्षा नव्हे, बोर्डच ‘नॉमिनल’ ! निकालात उच्चांक गाठणारे बोर्ड आता का मागे पडले?
11
मिसिंग लिंकवर सेल्फीसाठी थांबलात तर होईल मोठा ताप; वाहतूक पोलिसांकडून दाेन दिवसांत ९० वाहनांवर दंडात्मक कारवाई
12
या रक्तरंजित काळात कोहिनूरची आठवण का व्हावी?
13
कामगारांचा संताप आता रस्त्यावर उतरू लागला आहे, कारण..
14
सॉल्टलँड, परप्रांतीय आणि कॉन्स्टेबलचा मृत्यू..!
15
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
16
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
17
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
18
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
19
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
20
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हाधिकाऱ्यांनी केले मिर्झापूर येथे श्रमदान

By admin | Updated: May 2, 2017 00:18 IST

तालुक्यातील वॉटर कप स्पर्धेत सहभागी असलेल्या मिर्झापूर (नेरी) येथे ग्रामस्थ श्रमदानातून नंदनवन फुलविण्याचा प्रयत्न करीत आहे.

वॉटर कप स्पर्धा : अधिकाऱ्यांच्या हजेरीने ग्रामस्थांतही उत्साहआर्वी : तालुक्यातील वॉटर कप स्पर्धेत सहभागी असलेल्या मिर्झापूर (नेरी) येथे ग्रामस्थ श्रमदानातून नंदनवन फुलविण्याचा प्रयत्न करीत आहे. यात आणखी उत्साह भरता यावा म्हणून सोमवारी महाराष्ट्रदिनी जिल्हाधिकारी शैलेश नवाल, उपविभागीय अधिकारी आर्वी व जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकाऱ्यांनी श्रमदान केले. यामुळे ग्रामस्थांनाही प्रोत्साहन मिळाले.आर्वी येथील गांधी विद्यालयाच्या एनसीसीचे विद्यार्थी, शिक्षक नागरे, किटे, मॉडेल हायस्कूलचे प्राचार्य दर्भे, खोंडे व त्यांचे पथक, कला व वाणिज्य विज्ञान महा. आर्वीचे प्राचार्य हरिभाऊ विरूळकर, डॉ. पाटील, डॉ. राजू, डॉ. कालिंदी व इतर सहकाऱ्यांनी श्रमदान करीत सीसीटी बांधकाम पूर्ण केले. इंग्लिश स्कूलचे डाफे, जॉन व इतर शिक्षकांसह लॉयन्स क्लबचे डॉ. राणे व सभासद यांनी श्रमदान केले. मिर्झापूर येथील शाळकरी विद्यार्थी, महाविद्यालयाचे तरुण, गावातील महिला व नागरिकांतही या मान्यवरांच्या श्रमदानामुळे उत्साह संचारल्याचे पाहावयास मिळाले. सर्वांच्या सामूहिक प्रयत्नांमुळे सुमारे ५०० मिटर सीसीटीचे बांधकाम पूर्ण करता आले. वृक्षारोपण खड्डे व विहीर पुनर्भरणाचे कामही पूर्ण करण्यात आले. पूढील श्रमदानासाठी जिल्हाधिकारी नवाल व पथकाने ग्रामस्थांचे कौतुक केले. उपसरपंच प्रा. बाळा सोनटक्के यांनी प्रशासनाच्या सहकार्याबद्दल आभार मानले तर ग्रामसचिव शेंदरे यांनी श्रमदानाचे आवाहन केले.(शहर प्रतिनिधी)सावध (हेटी) गावात सीसीटीपाणी फाऊंडेशनमार्फत सुरू असलेल्या वॉटर कप स्पर्धेत सहभागी असलेल्या आर्वी तालुक्यातील सावध (हेटी) या गावातही श्रमदानासाठी शेकडो हात सरसावले आहेत. प्रशासनातील मान्यवर मंडळीही ग्रामस्थांच्या सहकार्यासाठी गावात पोहोचत असून सीसीटीचे काम केले जात आहे. ग्रामस्थांनी श्रमदानातून सीसीटीचे काम पूर्ण केले असून अन्य कामेही प्रगतिपथावर आहेत. श्रमदान करणारे हात वाढतच आहेत.