शहरं
Join us  
Trending Stories
1
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
2
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
3
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
4
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
5
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
6
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
7
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
8
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
9
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
10
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
11
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
12
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
13
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
14
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
15
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
16
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
17
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
18
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
19
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
20
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात वाहनांना संचारबंदी; प्रदूषण ‘लॉकडाऊन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2020 05:00 IST

मुख्यमंत्र्यांनी कोरोना संसर्ग रोखण्यासाठी संचारबंदी जाहीर केल्यानंतर सर्व वाहनांची चाके जागेवरच थांबली आहेत. जिल्ह्यात प्रत्येक व्यक्तीमागे १ वाहन आहे. यात दुचाकी वाहनांची संख्या मोठी आहे. या व सर्वच प्रकारच्या वाहनांमधून मोठ्या प्रमाणावर कार्बन डायऑक्साईड हवेत मिसळतो.

ठळक मुद्देध्वनी, वायूप्रदूषण घटले : कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे रस्तेही घेताहेत मोकळा श्वास

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी अगोदर जमावबंदी व आता १४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊनचा अंमल करण्यात आला आहे. यामुळे सर्व प्रकारची सार्वजनिक आणि खासगी वाहतूक बंद करण्यात आली आहे. केवळ अत्यावश्यक सेवा वगळता सर्व काही ठप्प आहे. परिणामी, रस्त्यांवर प्रचंड शुकशुकाट असून एखाद-दोन वाहनेच दृष्टीस पडत आहेत. यामुळे जिल्ह्यातील वायूप्रदूषणाची पातळी झपाट्याने कमी झाली आहे. कोरोनामुळे सर्व नागरिक घरातच असल्याने कोरोना संसर्गाला आळा घालण्यासाठी मदत होत असताना दुसरीकडे काही दिवसांकरिता तरी प्रदूषण कमी झाल्याचे चित्र आहे.जिल्ह्याची लोकसंख्या १२ लाखांवर आहे. तर नोंदणीकृत वाहनांची संख्या ३ लाख ८ हजार ९६० आहे. याशिवाय सार्वजनिक वाहनांची संख्या वेगळी आहे.मुख्यमंत्र्यांनी कोरोना संसर्ग रोखण्यासाठी संचारबंदी जाहीर केल्यानंतर सर्व वाहनांची चाके जागेवरच थांबली आहेत. जिल्ह्यात प्रत्येक व्यक्तीमागे १ वाहन आहे. यात दुचाकी वाहनांची संख्या मोठी आहे. या व सर्वच प्रकारच्या वाहनांमधून मोठ्या प्रमाणावर कार्बन डायऑक्साईड हवेत मिसळतो.तो आता थांबला आहे. त्यामुळे शुद्ध हवेत काही काळ वावरता येणार आहे. कार्बन डायऑक्साईड, सल्फर डाय आॅक्साईड या घातक वायूंचे प्रमाण कमी झाल्याने वातावरण स्वच्छ झाले असून हवेतील ऑक्सिजनचे प्रमाण वाढले आहे.वाहनेच रस्त्यांवरून धावत नसल्याने ध्वनिप्रदूषणालाही आळा बसला आहे. त्याचे सकारात्मक परिणाम दिसून येत आहेत. वाहनांमुळे होणारे किरकोळ अपघात आणि वादावादीही बंद झाल्याचे चित्र सध्या शहरातच नाही जिल्ह्याभरात पहावयास मिळत आहे.दुचाकी वाहनांची संख्या अडीच लाखांवरजिल्ह्यात ३ लाख ८ हजार ९६० नोंदणीकृत सर्व प्रकारची वाहने आहेत. यात मोटर, कार व इतर चारचाकी वाहने २० हजार ८२०, दुचाकींची संख्या २ लाख ५५ हजार १७७ इतकी आहे. ही सर्व वाहने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जागीच थांबली असल्याने ध्वनी आणि वायूप्रदूषणात बंदच्या काळापासून घट झाल्याचे चित्र आहे.जिल्ह्यात प्रत्येक कुटुंबात किमान चार दुचाकी वाहने आहेत. गुढीपाडवा आणि सणोत्सवात वाहनांची मोठ्या प्रमाणावर खरेदी आणि नोंदणी होते. यावेळी गुढीपाडवा सणावरही कोरोनाचे सावट होते. परिणामी नवीन दुचाकी, चारचाकी वाहनांची नोंदणी झाली नाही. संचारबंदीमुळे मागील ११ दिवसांपासून वाहतूक ठप्प आहे. यामुळे प्रदूषणात साहजिकच घट झाली आहे. ही पर्यावरणाच्या दृष्टीने अतिशय चांगली बाब म्हणावी.-विजय तिराणकरसहायक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, वर्धा

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसpollutionप्रदूषण