शहरं
Join us  
Trending Stories
1
गुड न्यूज...! पेट्रोल, डिझेल अन् घरगुती गॅसचे दर स्थिर राहणार...; जागतिक संकटानंतरही मोदी सरकारची मोठी घोषणा
2
“काँग्रेसमध्ये आमचे अनेक धुरंधर आहेत, ६ जण निवडूनही आलेत”; हेमंत बिस्वा सरमांचे मोठे विधान
3
शेजारच्या बाईने माझ्याविषयी अफवा पसरवली;पर्वती प्रकरणात आजोबांचा दावा; कोर्टात नेमकं काय घडलं ?
4
पराभव होताच ममतांच्या निकटवर्तीयांचे 'एक्झिट'! ज्या IAS अधिकाऱ्यासाठी घेतली होती PM मोदींशी टक्कर; त्यांनीही दिला राजीनाम!
5
SRH vs PBKS : झेल सोडण्याचा कहर! शशांक सिंगची पुन्हा मोठी चूक; चहलसह पॉटिंगही शॉक (VIDEO)
6
पश्चिम बंगालमध्ये भाजप देणार महिला मुख्यमंत्री? 'या' नावांची जोरदार चर्चा, ९ मे रोजी शपथविधी
7
“११८ आमदारांचा पाठिंबा असलेले पत्र घेऊन या”; राज्यपाल-विजय भेटीत काय घडले? TVKचे तोंडी बहुमत!
8
युद्धाचे ढग विरणार? अमेरिका आणि इराणमध्ये ऐतिहासिक कराराची तयारी; पुढच्या ४८ तासांत होणार मोठा फैसला!
9
मध्य रेल्वेवरील पहिल्या नॉन-AC लोकलची चाचणी मुंबईत होणार नाही, थेट उत्तर प्रदेशात! कारण काय?
10
IPL 2026, SRH vs PBKS: पंजाब किंग्सचे खेळाडू 'काळ्या फिती' बांधून का उतरले मैदानात? जाणून घ्या त्यामागचं कारण
11
तामिळनाडूमध्ये काँग्रेसची 'दिल्ली'सारखी चूक? विजयला पाठिंबा देण्याच्या निर्णयावरून 'त्या' पुनरावृत्ती भीती
12
West Bengal Violence : २०० हून अधिक FIR, ४३३ जणांना अटक; बंगाल निवडणुकीनंतर हिंसाचार, पोलिसांची मोठी कारवाई
13
“पंजाब स्फोटाबाबत भगवंत मान पाक ISIला क्लीन चिट का देतात, भाजपाशी एवढे वैर का?”: राघव चड्ढा
14
IPL 2026 : ...तर MS धोनीला फेअरवेल मॅचही मिळणार नाही? रविचंद्रन अश्विनचा मोठा दावा
15
आता पाकिस्तान कुणापुढे हात पसरणार? आधी तेल-पीठ झाले महाग, आता 'ही' जीवनावश्यक वस्तू मिळेना! 
16
प्रेमाचं नाटक, लग्नाचं आमिष आणि त्यानंतर...; मोहम्मद शमीच्या भावावर गंभीर आरोप
17
"माझ्या स्वतःच्याच बापाने माझ्या मुलीवर..., त्याला फाशी द्या', पुण्यातील चिमुकलीच्या आईचा आक्रोश
18
Top Marathi News LIVE: मुंबई हायकोर्टाकडून बेकायदा फेरीवाल्यांबाबत नाराजी, अहवाल सादर करण्याचे दिले निर्देश
19
अजितदादांच्या कार्याला सलाम, २१० किमी पोहायचा विक्रम; आर्यनसिंह यांनी घेतली सुनेत्रा पवारांची भेट
20
फक्त पाण्याने हात धुणं पुरेसं नाही; आजारांचं धक्कादायक वास्तव समजल्यावर नक्कीच बदलाल सवय
Daily Top 2Weekly Top 5

तालुक्यातील सहा मंडळस्तरावर पीककर्जाचे वाटप

By admin | Updated: May 28, 2016 02:11 IST

तालुक्यातील देवळी, पुलगाव, गिरोली, विजयगोपाल, भिडी अंदोरी आदी सहा मंडळ स्तरावर शुक्रवारी पीककर्ज मेळावे घेण्यात आले.

बँकेच्या नियमांमुळे अनेक अडचणी : आयोजित मेळाव्यात बँक अधिकारी व कास्तकारांची उपस्थिती
देवळी : तालुक्यातील देवळी, पुलगाव, गिरोली, विजयगोपाल, भिडी अंदोरी आदी सहा मंडळ स्तरावर शुक्रवारी पीककर्ज मेळावे घेण्यात आले. या मेळाव्यात नवीन पीककर्ज, पीककर्जाचे नूतनीकरण तसेच पीककर्जाच्या पुर्नगठनाबाबत विचारविनीमय होवून काही प्रकरणे निकाली काढण्यात आली. देवळी येथील मेळाव्यात बँक विविध बँकेच्या अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
आयोजित मेळाव्यात १९ मे नंतर आजपावेतो देण्यात आलेल्या पीककर्जाची माहिती देण्यात आली. देवळी येथे ३१० पीककर्जाची प्रकरणे निकाली काढून २ कोटी ८७ लाखांचे वाटप करण्यात आले. यामध्ये नवीन प्रकरणे ३३, पीककर्जाचे नूतनीकरण २७० तसेच पुनर्गठनाचे ७ प्रकरणे निकाली काढण्यात आली. गिरोली या मंडळस्तरावर ५८ प्रकरणे निकाली काढून ३६ लाखांचे कर्जवाटप करण्यात आले. यामध्ये नवीन प्रकरणे आठ, पीककर्जाचे नूतनीकरण ४२ तसेच पुनर्गठनाची आठ प्रकरणे करण्यात आली.
भिडी मंडळस्तरावर ५२ प्रकरणे निकाली काढून १८ लाखांचे कर्ज वाटप करण्यात आले. यामध्ये नवीन प्रकरणे दोन, तसेच पीककर्ज नुतनीकरणाची ५० प्रकरणे निकाली काढण्यात आली. पुलगाव मंडळस्तरावर नवीन प्रकरणे १२, पीककर्जाचे नुतनीकरण, ९६ तसेच पुनर्गठनाची आठ प्रकरणे निकाली काढून ९० लाखाचे पीककर्ज वाटण्यात आले. अशी माहिती तहसील कार्यालयाच्यावतीने देण्यात आली. देवळी मंडळस्तरासाठी स्थानिक तहसील कार्यालयात शुक्रवारी आयोजित मेळाव्यात नवीन पीककर्जाची १० प्रकरणे तसेच पीककर्जाचे नुतनीकरण ४० व पुनर्गठनाचे सात प्रकरणे निकाली निघाली. मेळाव्याला उपविभागीय अधिकारी स्मिता पाटील, उपजिल्हाधिकारी पांडे, तहसीदार तेजस्विनी जाधव, नायब तहसीलदार स्रेहल ढोके व बी.एस. भागवत तसेच मंडळ अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.(प्रतिनिधी)

नियमांच्या आडकाठीने शेतकरी त्रस्त
देवळी मंडळात मेळाव्यात पीककर्जाच्या आशेने आलेल्या कास्तकारांच्या अनेक प्रकरणात बँकेचे नियम अडचणीचे ठरले. त्यामुळे अनेक कास्तकार पीककर्जापासून वंचित राहिले.

हिंगणघाट येथे उदासीनता
जिल्हाभर असलेल्या या कर्ज मेळाव्याकडे हिंगणघाट मंडळातील शेतकऱ्यांकडून विशेष सहकार्य मिळाले नसल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. या मंडळात शेतकऱ्यांकडून कर्जाकरिता केवळ बँकेत गर्दी होत असल्याचे दिसून आले आहे.