शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
4
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
5
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
6
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
7
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
8
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
9
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
10
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
11
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
12
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
13
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
14
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
15
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
16
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
17
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
18
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
19
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
20
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
Daily Top 2Weekly Top 5

तालुक्यातील सात सेवा सहकारी संस्थांवर बरखास्तीची कारवाई

By admin | Updated: May 8, 2015 01:47 IST

तालुक्यातील आंजी (बऱ्हाणपूर), आकोली, चोंढी, हिवरा (कावरे), शिरपूर, वाटखेडा, फत्तेपूर या सात गावातील सेवा सहकारी संस्थाचे संचालक मंडळ बरखास्त करण्यात आले.

देवळी : तालुक्यातील आंजी (बऱ्हाणपूर), आकोली, चोंढी, हिवरा (कावरे), शिरपूर, वाटखेडा, फत्तेपूर या सात गावातील सेवा सहकारी संस्थाचे संचालक मंडळ बरखास्त करण्यात आले. को-आॅपरेटीव्ह बँकेचे संचालक बहुमताने थकबाकीदार ठरल्यामुळे त्यांच्यावर तालुका उपनिबंधक एस.पी. गुधाणे यांनी कारवाई केली. थकबाकीदार असलेले या गावातील ७९ व उर्वरित गावातील ४७ असे एकूण १२८ संचालक, आगामी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीपासून वंचित राहणार आहेत. पुलगाव- देवळी कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक उंबरठ्यावर आहे. त्यातच बँकेचे थकीतदार ठरलेल्या सेवा सहकारी संस्थेच्या संचालकांवर कारवाई करण्यात आल्यामुळे खळबळ माजली आहे. या निवडणुकीच्या मतदारांची अंतिम यादी नुकतीच प्रसिद्ध करण्यात आली असून निवडणूक कार्यक्रमाकडे सर्व राजकीय पक्षांचे डोळे लागले आहे. या बाजार समितीसाठी १९ जणांचे संचालक मंडळ निवडून द्यावयाचे आहे. यामध्ये सेवा सहकारी मतदार संघातून ११, ग्रा.प. मतदार संघातून चार तसेच हमाल व मापारी मतदारसंघात चार उमेदवारांचा समावेश राहणार आहे.या आधी सेवा सहकारी मतदार संघात तालुक्यातील ४९ सहकारी संस्थाचे ५९३ संचालक मतदान करीत होते; आजस्थितीत वेगवेगळ्या कारणांनी तालुक्यातील सेवा सहकारी संस्थाची संख्या ३७ पर्यंत पोहोचली आहे. मतदारांची संख्या ४०० पर्यंत घसरल्यामुळे अपेक्षीत राजकीय गटांची दाणादाण उडाली आहे. बाजार समितीच्या ग्रा.पं. मतदार संघात ४८२ मतदार असून चार संचालक निवडून द्यावयाचे आहे. हमाल व मापारी मतदार संघात ४६ मतदार असून येथूनही चार संचालक निवडून द्यावयाचे आहे. बाजार समितीची निवडणूक काँग्रेसचे आमदार रणजीत कांबळे व सहकारचे प्रा.सुरेश देशमुख या दोन्ही गटासाठी प्रतिष्ठेची ठरणार आहे. तालुक्यातील सेवा सहकारी संस्था व ग्रा.पं. मतदार संघावर आ. कांबळे यांचा वरचश्मा असला तरी निवडणुकीतील चित्र काय राहतील, याकडे सहकार क्षेत्राचे लक्ष लागले आहे.(प्रतिनिधी)