निर्मनुष्य परिसरात स्वखर्चातून निर्जंतुकीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2020 06:00 AM2020-03-30T06:00:00+5:302020-03-30T06:00:16+5:30

कोरोना विषाणू संसर्गाने नागरिकांमध्ये चांगलीच धास्ती भरली आहे. वर्धा जिल्ह्यात कोरोनाचा एकही रुग्ण नसला तरी प्रशासनाकडून कमालीची खबरदारी बाळगली जात आहे. विविध उपाययोजना राबविल्या जात आहे. संचारबंदी लागू असल्याने तसेच लॉकडाउनमुळे दुकानदारांनी आपली प्रतिष्ठाने बंद ठेवली आहेत. ऐरव्ही गजबजून राहणारे रस्ते निर्मनुष्य आहे.

Disinfection at self-expenditure in sterile areas | निर्मनुष्य परिसरात स्वखर्चातून निर्जंतुकीकरण

निर्मनुष्य परिसरात स्वखर्चातून निर्जंतुकीकरण

Next
ठळक मुद्देसामाजिक उत्तरदायित्व : नवदुर्गा पूजा उत्सव समितीचा पुढाकार

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : संपूर्ण देशात कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी पुढाकार घेण्यात येत असून प्रशासनाकडून विविध उपाययोजना राबविण्यत येत असून निर्मनुष्य रस्त्यांचे निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे. याला आता स्थानिकांचीही मदत मिळू लागली असून कपडा लाईन परिसरात नवदुर्गा पूजा उत्सव समितीतील सदस्यांकडून स्व:खर्चातून परिसरात निर्जंतुकीकरण मोहिम राबविण्यात येत आहे.
कोरोना विषाणू संसर्गाने नागरिकांमध्ये चांगलीच धास्ती भरली आहे. वर्धा जिल्ह्यात कोरोनाचा एकही रुग्ण नसला तरी प्रशासनाकडून कमालीची खबरदारी बाळगली जात आहे. विविध उपाययोजना राबविल्या जात आहे. संचारबंदी लागू असल्याने तसेच लॉकडाउनमुळे दुकानदारांनी आपली प्रतिष्ठाने बंद ठेवली आहेत. ऐरव्ही गजबजून राहणारे रस्ते निर्मनुष्य आहे. शहरातील रस्त्यांवर नगर पालिका प्रशासनाकडून निर्जंतुकीकरण औषधांची फवारणी केली जात आहे. प्रशासनाच्या या उपक्रमाला नागरिकांनीही मदतीची जोड दिली असून वर्ध्यातील नवदुर्गा पूजा उत्सव समितीने कपडा लाईन परिसरात निर्जंतुकीकरण मोहिम राबविली असून सर्वस्वी भार प्रशासनाला न देता स्वत:च उचलला आहे.
या मोहिमेत परेश शर्मा, वरुण फत्तेपुरिया, नौशाद बक्ष, बंटी व्यास, निखील रोकडे, सचिन कासलीवाल, अंशुल जैन, अश्विन जैन आदींसह कपडा लाईन परिसरातील अनेक व्यावसायिक सहभागी होते.

Web Title: Disinfection at self-expenditure in sterile areas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.