शहरं
Join us  
Trending Stories
1
“असा नेता लाभणे भारताचे भाग्य”; प. बंगाल विजयानंतर ट्रम्प यांनी केले PM मोदींचे खास अभिनंदन
2
पुण्यात आजोबाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
3
“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
4
संजूचा धमाका; कार्तिक शर्मानंही दाखवला दम! DC ला पराभूत करत CSK नं प्लेऑफ्सची दावेदारी केली भक्कम
5
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
6
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
7
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
8
काय रे देवा! दोघांच्या गोंधळात तिसऱ्याचा फायदा; चेन्नईकरांनी Sameer Rizvi चा सोपा झेल सोडला (VIDEO)
9
“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका
10
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
11
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
12
चौकट मोडली, T20 मध्ये छाप सोडली! केएल राहुल म्हणतो; "प्रत्येक वेळी मनासारखं घडत नाही, पण…"
13
टी-२० क्रिकेटमध्ये टीम इंडियाला तोड नाही; IPL दरम्यान ICC नं केली मोठी घोषणा
14
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
15
इंडिगो विमानात पॉवर बँकचा स्फोट; विमानतळावर प्रवाशांची आपत्कालीन सुटका, एक महिला जखमी
16
Latest Marathi News LIVE: गोंदियात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी चिंतेत
17
IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली
18
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
19
Budget Travel: अवघ्या २० हजारांत अनुभवा केरळचं सौंदर्य; वायनाडला भेट देण्यापूर्वी हे नक्की वाचा!
20
IAS Ayush Goel : वडिलांनी चहा, भाजी विकून शिकवलं, लेकाने कष्टाचं सोनं केलं; २८ लाखांची नोकरी सोडली, झाला IAS
Daily Top 2Weekly Top 5

किसान जागृतीच्या सभेत शेतकरी आत्महत्येवर चर्चा

By admin | Updated: August 6, 2015 00:32 IST

राष्ट्रीय किसान जागृती अभियानातील कार्यकर्त्यांची सभा पार पडली. यात केंद्र सरकारच्या भूमि अधिग्रहण विधेयकाचा विरोध करण्यासाठी भजन सत्याग्रह करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

वर्धा : राष्ट्रीय किसान जागृती अभियानातील कार्यकर्त्यांची सभा पार पडली. यात केंद्र सरकारच्या भूमि अधिग्रहण विधेयकाचा विरोध करण्यासाठी भजन सत्याग्रह करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. मार्गदर्शक म्हणून प्रचारक अभिमन्यू भारतीय उपस्थित होते.विदर्भातील सत्ताधारी खासदार यांच्या घरी जाऊन हा भजन सत्याग्रह करण्यात येणार आहे. तसेच या विधेयकाला विरोध असल्याचे निवेदन सादर करण्यात येईल, अशी माहिती यावेळी सदस्यांना देण्यात आली. यावेळी सभेत शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि सरकारची भूमिका याचा निषेध करण्यात आला. तसेच केंद्रीय कृषिमंत्र्यांनी शेतकरी आत्महत्येविषयी जे बेजबाबदारपणाचे कथन केले, त्याचा निषेध निवेदनातून करण्यात आला. याचे निवेदन जिल्हाधिकारी यांना कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत सादर करण्यात आले. सरकारच्या शेतकरीविरोधी नीतीचा परिणाम म्हणून शेतकरी समुदायात आत्महत्यांचे प्रमाण वाढीस लागले आहे. मागील सरकारच्या कार्यकाळात झालेल्या शेतकरी आत्महत्या पाहता वर्तमान सरकारच्या कार्यकाळात शेतकरी आत्महत्यांची गती वाढली असल्याचा सूर यावेली व्यक्त झाला. सभेला विनोद बुधबआवरे, शरद मेहकर, योगीराज खांडेकार, आकाश खांडेकर, रमेश सोलव, प्रभाकर गाढवे, अतुल अमझरे यांची तसेच सदस्यांची उपस्थिती होती.(स्थानिक प्रतिनिधी)