शहरं
Join us  
Trending Stories
1
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
2
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
3
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
4
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
5
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
6
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
7
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
8
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
9
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
10
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
11
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
12
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
13
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
14
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
15
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
16
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
17
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
18
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
19
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
20
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
Daily Top 2Weekly Top 5

वंचित चिमुकल्यांचा ढोल-ताशा निनादणार !

By admin | Updated: January 19, 2017 00:29 IST

शहरात प्रथमच लोकसंगीताच्या पारंपरिक वाद्यप्रकार ‘आरंभ ढोल ताशा पथक’ाच्या स्वरूपात करण्यात येत आहे.

 जगदंब प्रतिष्ठानचा नवोपक्रम : विकासापासून दूर समाज घटकांच्या उंचावल्या आशा वर्धा : शहरात प्रथमच लोकसंगीताच्या पारंपरिक वाद्यप्रकार ‘आरंभ ढोल ताशा पथक’ाच्या स्वरूपात करण्यात येत आहे. यात ८ ते १० वर्षे वयोगटातील वंचित घटकातील मुलांना सहभागी करून घेतले जात आहे. जगदंब प्रतिष्ठानद्वारे राबविल्या जात असलेल्या या नवोपक्रमात सहभागी वंचित चिमुकल्यांचा ढोल-ताशा निनादणार आहे. या वाद्य प्रकाराला राजदरबारी मानाचे स्थान आहे. भारतीय परंपरेत सार्वजनिक वा खासगी तथा पारिवारिक ठिकाणी शुभकार्याची सुरूवात मंगल वाद्याने होते. ‘ढोल ताशा’ हा वाद्यप्रकार शिरपेचच मानला जातो. मर्दानी ढंगात रूबाबदार राजेशाही पद्धतीने सादर केला जाणारा हा वाद्यप्रकार आहे. चिमुकल्यांच्या साथीने हा वाद्यप्रकार वर्धा शहरात प्रथमच सुरू केला जात आहे. ‘जगदंब प्रतिष्ठान’द्वारे हा उपक्रम राबविला जात आहे. या मर्दानी वाद्याचा प्रचार व प्रसार करण्यासाठी हा प्रयत्न केला जात असल्याचे कळविण्यात आले आहे. समाजातील वंचित व गोर गरीब मुला-मुलींना यात सहभागी करून घेत त्यांना विकासाच्या प्रवाहात आणण्याचा प्रयत्न ‘जगदंब प्रतिष्ठान’द्वारे आरंभ ढोल-ताशा पथकाच्या माध्यमातून केला जात आहे. शालेय, महाविद्यालयीन शिक्षण घेण्याची इच्छा आहे; पण आर्थिक वा तत्सम कारणांमुळे जी मुले शिक्षण घेऊ शकत नाही, ती शिक्षणापासून वंचित राहतात. अशा मुलांच्या शिक्षणाचा सर्व खर्च ‘जगदंब प्रतिष्ठान’कडून करण्यात येणार आहे. प्रतिष्ठानला मिळणाऱ्या मानधनाचा वापर याच उपक्रमासाठी केला जाणार असल्याचेही सांगण्यात आले आहे. ‘जगदंब प्रतिष्ठान’द्वारे संस्कृती जपण्याच्या व प्रसाराच्या उद्देशाने अनेक उपक्रम राबविले जाणार आहेत. यात मर्दानी खेळांचे प्रशिक्षण, विविध प्रकारची शिबिरे, गडकिल्ले स्पर्धा, अभिनव कौशल्य शिबिर आदींचा समावेश आहे. नागरिकांनी या राष्ट्रीय कार्यात सहभागी व्हावे. आरंभ ढोल ताशा पथक व इतर उपक्रमांच्या आयोजनाची संधी उपलब्ध करून द्यावी. वादक लहान मुलांचा उत्साह वाढवावा, असे आवाहनही प्रतिष्ठानने केले आहे.(कार्यालय प्रतिनिधी)