शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
2
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
3
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
4
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
5
Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?
6
...अन सर्वांसमोर तिने धरला अभिषेक शर्माचा हात, फलंदाज झाला अवाक्, त्यानंतर.....  
7
संगणक शास्त्रातील पदव्युत्तर पदवी, अभियंता, व्हिडीओ गेम डेव्हलपर; वॉशिंग्टन गोळीबार प्रकरणातील हल्लेखोराची माहिती आली समोर
8
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
9
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
10
चाबहार बंदरात चीनच्या घुसखोरीची भीती; इराणमध्ये भारताचे ₹११३० कोटी पनाला, कारण काय...
11
फिट असूनही धोनी का खेळत नाही आहे? चेन्नई सुपरकिंग्सच्या गोटातून समोर आलं असं कारण 
12
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
13
शुभेंदू अधिकारी यांच्या सभेत घडलं असं काही, हाकेच्या अंतरावर असलेल्या ममता बॅनर्जी भडकल्या, थेट सभा सोडून निघून गेल्या
14
मुकेश अंबानींच्या Reliance ने इतिहास रचला; असा कारनामा करणारी देशातील पहिली कंपनी...
15
तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार...
16
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
17
दिल्ली विमानतळावर अपघात! २३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्विस एअरच्या विमानाच्या इंजिनला आग; ६ जण जखमी, धावपट्टी बंद
18
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
19
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
20
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात अतिसार पंधरवड्यालाच ‘अतिसार’

By admin | Updated: August 1, 2014 00:24 IST

अतिसारावर प्रतिबंध लाावण्याकरिता शासनाच्यावतीने अतिसार पंधरवडा जाहीर केला. दोन आठवड्यात राबविण्यात येत असलेल्या या पंधरवड्यात वाटण्यात येणार असलेल्या गोळ्या व ओआरएस पावडरचा

औषधीच नाही : सव्वा लाख चिमुकल्यांना प्रतीक्षारूपेश खेरी - वर्धाअतिसारावर प्रतिबंध लाावण्याकरिता शासनाच्यावतीने अतिसार पंधरवडा जाहीर केला. दोन आठवड्यात राबविण्यात येत असलेल्या या पंधरवड्यात वाटण्यात येणार असलेल्या गोळ्या व ओआरएस पावडरचा साठाच आला नाही. पंधरवडा सुरू होऊन पाच दिवसांचा कालावधी होत असला तरी जिल्ह्यात आवश्यक औषधीसाठा आला नसल्याने आरोग्य विभागाची तारांबळ उडत आहे.नुकत्याच झालेल्या सर्वेक्षणात अतिसारामुळे चिमुकल्यांचा मृत्यू होत असल्याचे समोर आले. हे प्रमाण शंभर बालकांमागे ११ असे असल्याने यावर प्रतिबंध लावण्याकरिता शासनाच्यावतीने २८ जुलैपासून अतिसार पंधरवाडा जाहीर करण्यात आला. या पंधरवड्यात शुन्य ते पाच वयोगटातील चिमुकल्यांच्या घरांचा शोध घेत त्यांना ओआरएस पावडर व झिंक या गोळ्या देण्याचा निर्णय घेण्यात आला. हा पंधरवडा जाहीर करण्यापूर्वी आवश्यक औषधीसाठा जिल्ह्यात येणे आवश्यक होत; मात्र तसे झाले नाही.जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रासह जिल्हा सामान्य रुग्णालयांतर्गत येत असलेल्या रुग्णालयांना औषधी पुरविण्याकरिता शासनाकडून केंद्रीय स्तरावर खरेदी केली जाते. तेथून आवश्यकतेनुसार जिल्ह्यात तो औषधीसाठा पुरविण्यात येतो. या पंरवड्याकरिता औषधीसाठा खरेदी करताना ोंधळ झाल्याने पंधरवडा सुरू झाला तरी जिल्ह्यात औषधीसाठा आला नाही. यामुळे शासनाच्या या पंधरवड्यादरम्यान जिल्ह्यात काय वाटाप करावा, असा प्रश्न आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना पडला आहे. या पंधरवड्यात केवळ औषध वाटप करणे केवळ हाच उद्देश नाही तर या आजाराबाबत जनजागृती करण्याचाही उद्देश आरोग्य विभागाचा होता; मात्र औषधीसाठा आलाच नसल्याने शासनाने जाहीर केलेला उद्देश पूर्ण होत नसल्याचे दिसत आहे. जिल्ह्यात हव्या १७.७५ लाख गोळ्या शासनाच्या अतिसार पंधरवड्यात जिल्ह्यातील शून्य ते पाच वयोगटातील सव्वा लाख चिमुकल्यांना या गोळ्या देण्यात येणार आहे. यात एका बालकाला या पंधरवड्यात १४ गोळ्या देण्यात येणार आहे. सोबतच ओआरएसचे पावडरही देण्यात येणार आहे. गोळ्यांचे प्रमाण व मुलांची संख्या याचे गणित केल्यास जिल्ह्यात १७ लाख ७५ हजार गोळ्यांची गरज आहे. यात शून्य ते सहा वयोगटातील मुलांना अर्धीच गोळी देण्यात येणार असल्याने संख्या कमी जास्त होण्याची शक्यता असल्याचे आरोग्य विभागाच्यावतीने सांगण्यात आले आहे.जिल्ह्यात २७ प्राथमिक आरोग्य केंद्र जिल्ह्याच्या ग्रामीण भागाचे आरोग्य सांभाळण्याची जबाबदारी २७ प्राथमिक आरोग्यकेंद्राकडे आहे. या आरोग्य केंद्रांतर्गत जिल्ह्यात सव्वा लाख बालके येत आहेत. या बालकांना हे औषध पुरविण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे. या बालकांना पावसाळ्याच्या दिवसात अतिसाराची लागण होत असून त्यांना औषधी मिळत नसल्याने मोठी समस्या निर्माण झाली आहे.