नायब तहसीलदारांनी काढावयास लावल्या उठाबशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2020 05:00 IST2020-04-26T05:00:00+5:302020-04-26T05:00:33+5:30

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन आणि जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आल्याने प्रत्येकाने घरात थांबण्याचे आवाहन करण्यात येत आहे. परंतु, काही व्यक्ती विनाकारण घराबाहेर पडत असल्याचे निदर्शनास असल्यावर जिल्हा प्रशासनाने बेशिस्तांना शिस्त लावण्यासाठी काही विशेष चमू तयार केल्या आहेत.

The Deputy Tehsildar | नायब तहसीलदारांनी काढावयास लावल्या उठाबशा

नायब तहसीलदारांनी काढावयास लावल्या उठाबशा

ठळक मुद्देविनाकारण फिरणाऱ्यांचा घेतला क्लास । घरात राहण्याचे पटवून दिले महत्त्व

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : लॉकडाऊन आणि संचारबंदीच्या काळात विनाकारण घराबाहेर फिरणाऱ्यांसह मास्कचा वापर न करणाºयांचा महिला नायब तहसीलदारांनी चांगलाच क्लास घेतला. या क्लासदरम्यान विनाकारण फिरताना आढळलेल्यांना चक्क उठाबशा काढण्याची शिक्षाच दिली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन आणि जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आल्याने प्रत्येकाने घरात थांबण्याचे आवाहन करण्यात येत आहे. परंतु, काही व्यक्ती विनाकारण घराबाहेर पडत असल्याचे निदर्शनास असल्यावर जिल्हा प्रशासनाने बेशिस्तांना शिस्त लावण्यासाठी काही विशेष चमू तयार केल्या आहेत. याच चमूपैकी एका चमूचे नेतृत्त्व करणाऱ्या नायब तहसीलदार डॉ. शकुंतला पाराजे यांना काही व्यक्ती जिल्हा प्रशासनाच्या सूचनांकडे पाठ दाखवत असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर नायब तहसीलदार डॉ. शकुंतला पाराजे यांनी आपले शासकीय वाहन थांबवून त्या व्यक्तींना आपण कुठल्या कारणाने घराबाहेर फिरत आहेत याबाबतची विचारणा केली. परंतु, अतिशय महत्त्वाचे कारण नसताना हे व्यक्ती घराबाहेर पडल्याचे लक्षात येताच सुरूवाला त्यांना समुपदेशन करण्यात आले. त्यानंतर या व्यक्तींकडून झालेल्या चुकीबाबत उठाबशा काढून घेण्यात आल्या. वर्धा तालुका प्रशासनातील महिला अधिकाºयांच्या या नावीन्यपूर्ण कारवाईमुळे विनाकारण घराबाहेर पडणाºयांचे धाबे दणाणले आहे.

Web Title: The Deputy Tehsildar